आळंदी: श्री क्षेत्र आळंदी येथील येथील नागरिक, भाविक, वारकरी यांना भामा आसखेड पाणी योजनेतून विशेष पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात महत्वपूर्ण भुमिका बजावणारे पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा समस्त आळंदीकर नागरिक आणि महाराज मंडळीच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी हभप डाॅ.नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते त्याना वारकरी संप्रदायाचा फेटा,संत ज्ञानेश्वर महाराज मुर्ती देऊन सन्मानित करण्यात आले.

नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर,हभप चैतन्य महाराज लोंढे,आध्यात्मिक विकास आघाडी चे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख हभप संजय महाराज घुंडरे,माजी सभापती डि.डि.भोसले,जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख,माजी नगराध्यक्ष बबनराव कु-हाडे,सचिन पाचुंदे,शारदा वडगावकर,हभप भाऊमहाराज फुरसुंगीकर,माऊली वीर,नगरसेवक प्रशांत कु-हाडे, सचिन गिलबिले,सागर बोरुंदिया,सचिन काळे,माजी नगरसेवक दिनेश घुले,अशोकराव उमरगेकर,नंदकुमार कु-हाडे,वासुदेव घुंडरे,भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे,अजित वडगावकर,भागवत आवटे,गुलाबराव खांडेभराड,माऊली बनसोडे,पांडुरंग ठाकुर,आसाराम महाराज बडे,पंडित महाराज क्षीरसागर,महाराज मंडळी आणि आळंदीकर नागरिक तसेच महापौरांच्या मातोश्री आणि बंधू सुध्दा उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की आळंदी शहराला पाणी देण्याच्या या निर्णयाला कोणाचाही विरोध नव्हता परंतु आयुक्तांकडून ही मागणी पूर्ण करण्यासाठी शेवटी भांडायचेच बाकी होते. माऊलींनीच त्याना आदेश दिला असावा आणि कोणत्याही अटी शर्ती शिवाय आळंदीला पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली,विशेष योगायोग म्हणजे त्याच दिवशी आळंदी शहराला जलसंपदा विभागाकडून स्वतंत्र पाण्याचा कोटा मंजूर करण्यात आला आणि आळंदीला स्वतःचे हक्काचे पाणी मिळाले यासाठी पालकमंत्री अजित पवार,खासदार गिरिष बापट,आमदार चंद्रकांत पाटील, दिलीप मोहीते पा. यांचे विशेष सहकार्य राहीले विशेषतः नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर,संजय घुंडरे यांनी सुध्दा माझ्या कडे अनेक वेळा येऊन पाणी पुरवठा मंजूर करण्याचा तगादा लावला शेवटी माऊली कृपेने सर्व अडचणी दूर होऊन आळंदीतील नागरिक,भाविक आणि वारकऱ्यांना हा पाणीपुरवठा मंजूर झाला याचे मला आत्मिक समाधान आहे आणि माझ्या महापौर पदाच्या कार्यकाळात कायम आठवणीत राहील असा एक महत्त्वपुर्ण निर्णय आहे.

अधिक वाचा  नाशिकमध्ये ना भुजबळ, ना गोडसे; दोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच उमेदवारीचा लाभ !