धडाडीची कार्यकर्ती आणि ध्यानी मनी शिक्षिकी पेशाची काळजी …. जमिनीवर पाय अन् मुखी गोडवा असलेले नाव म्हणजे……नगरसेविका अल्पनाताई गणेश वरपे. कोथरुड – बावधन भागातील सामान्य नागरिकांना हक्काचा आधार म्हणून अल्पना गणेश वर्पे यांची आठवण येते. पुण्यात जागतिक महामारी कोरोनाची चाहूल लागल्यावर घाबरलेल्या जीवा – भावाच्या नागरिकांना आधार देण्याचे काम नगरसेविका सौ.अल्पना गणेश वरपे यांनी केले.

दक्षता अन् पुर्वतयारी…

जागतिक कोरोना महामारीची चाहुल लागल्यानंतर नगरसेविका अल्पनाताई वरपे यांनी आपल्या प्रभाग निर्जंतुकीकरण करण्यासाठी प्रभागात स्वतः उपस्थित राहून सोडिअम हायपोक्लोराईट औषध फवारणी केली. मोकाटेनगर, शास्त्रीनगर, गादिया इस्टेट, लोकमान्यनगर, बावधन खुर्द, महात्मा सोसायटी, कोकाटेवस्ती, सागर कॉलनी, परमहंस नगर भागातील सार्वजनिक जागी औषध फवारणी करण्याचे काम केले. त्यानंतर नागरिकांना सानिटाईझरचे वाटप करण्याच्या कामाला सुरुवात केली. प्रभागातील जीवनावश्यक वस्तूंचे किराणा विक्रेते, भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते आणि मेडिकल विक्रेते यांची एक संयुक्त यादी व संपर्क क्रमांकांची यादी करून नागरिकांना उपलब्ध करून दिली तसेच ज्येष्ठ नागरिक व गरजूंना ही घरपोच सुविधा करण्याकरिता भागानुसार कार्यकर्त्यांचे ग्रुप तयार केले; तसेच या दुकानदारांना सोशल डिस्टन्सिंगचे बाबत काळजी घेण्याचे आवाहन केले व काही ठिकाणी स्वतः उपस्थित राहून मार्किंग करून दिले. प्रभागातील लोकांनी सोशल डिस्टेंस पाळण्यासाठी झोपडपट्टीमधील नागरिकांना प्रबोधन करण्याची गरज लक्षात घेतली. कोथरुड बावधन भागात असलेली समिश्र लोकवस्ती लक्षात घेऊन त्यांच्या उपजीविका आणि समस्या यांचा योग्य संयम घालत प्रभागातील लोकांना कोरोनाला हरवण्यासाठी सज्ज केले. त्यानतंर समस्या सोडविण्यासाठी प्रभागातील लोकांना बरोबर घेवून कोरोना युद्ध सुरु केले.

अधिक वाचा  तिरुपती बालाजीच्या चरणी 11 टन सोनं अन् 18 हजार कोटी

मध्यम वर्गियांना हक्काचा आधार ……
कोथरुड बावधन भागातील समिश्र लोकवस्ती लक्षात घेऊन मोकाटेनगर, शास्त्रीनगर, गादिया इस्टेट, लोकमान्यनगर, बावधन खुर्द, सागर कॉलनी, कोकाटेवस्ती, एकलव्य कॉलेज, शिव नगरी, भागातील गरजू मजूर, कामगार, वॉचमन, रिक्षाचालक, सफाई कामगार या मध्यमवर्गीय नागरिकांची अन्न धान्याची गरज लक्षात घेऊन अल्पनाताई वरपे यांनी सर्व नगरसेवकांना एकत्र येऊन शिधावाटप करण्याची संकल्पना सुचवली. त्यानंतर गरजवंतांची भुक भागवण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली असून लॉकडाऊन च्या 3 टप्प्यांतही ही योजना सुरु आहे. प्रभागात आतापर्यंत ७५०० ते ८००० कुटुंबांना तांदूळ, गहू, तूरडाळ, आटा, साखर, चहापावडर, रवा, पोहे, मटकी, साबण,मीठ जीवनावश्यक किट चे वाटप केले आहे.

अधिक वाचा  सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचं गुजरात कनेक्शन असल्याची माहिती समोर

सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोकाच्या तपासणीला प्राधान्य देत अल्पनाताई गणेश वरपे यांनी कॅपिटल हाॅस्पीटल व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉक्टर आपल्या दारी’ ही योजना प्रभागात राबवत सर्व भागात गरजू नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आले. उजवी व डावी भुसारी काॅलनी, इंदिरा शंकर नगरी, गादिया ईस्टेट, मोकाटे नगर, वेदभवन मंदिर परिसर या भागांमध्ये तपासणी केली.

शिक्षिकेचे उत्त्म व्यवस्थापन ……
कोथरुड – बावधन प्रभागातील लोकांना कोरोनाचा विळखा बसू नये यासाठी अल्पनाताई गणेश वरपे यांनी प्रभागात कोरोना रोखण्यास सचोटीने सखोल उपक्रमांची आखणी केली. प्रभागातील अत्यावश्यक व आरोग्य विभागात काम करणार्‍या डाॅक्टर, कर्मचारी,सफाई कामगार यांना फेसशिल्ड,मास्क,सॅनिटायझर, हॅन्डग्लोव्हजचे वाटप करण्यात आले. सुरुवातीला सामान्य नागरिक जमा होणारी सार्वजनिक ठिकाणे यांची यादी करुन गर्दी कमी करण्याचं नियोजन केले. या भागातील पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी यांची योग्य सांगड घालत अंतर्गत रस्ते बंद करण्याचे काम केले. लाॅकडाऊनच्या दुसर्‍या टप्प्याच्या काळात अनेक परराज्यातील व परगावातील नागरिक जे पुण्यात अडकले होते त्यांना गावाला जाण्याची परवानगी काढण्याचे मार्गदर्शन तसेच तंदुरूस्तीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत केली.

अधिक वाचा  IPL मॅचच्या बेकायदेशीर स्ट्रीमिंगप्रकरणी तमन्ना भाटिया अडचणीत; बजावले समन्स

समूह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी एकमेव कारण असलेल्या भाजी- पाला विक्रीचेही नियोजन करण्यात आले. उत्थान फार्मर शेतकरी आठवडे बाजाराच्या माध्यमातून ताजा भाजीपाला व फळे मागणीनुसार टेम्पोद्वारे सोसायटींमध्ये देण्याची व्यवस्था केली तसेच दररोज सोशल डिस्टन्सिंग ची काळजी घेऊन प्रभागातील भुसारी काॅलनी येथील स्वा.सावरकर मैदान येथे व्यवस्था केली आहे. त्यामुळे याभागातील गर्दी कमी करण्यात यश आले. आज कोथरुड – बावधन प्रभागातील नियंत्रीत कोरोना हे याच शिक्षिकेच्या उत्तम व्यवस्थापन चे फलित आहे.