शिरुर : शिरुर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आव्हान स्वीकारल्यानंतर आज दुसरा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. आढळराव पाटील आपल्या खासदारकीचा वापर कश्या पद्धतीने स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी करत होते हे या व्हिडिओत पुराव्यासह स्पष्ट केलं आहे.

जुन्नर तालुक्यातील ओतूर मध्ये जाहीर सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या खासदारकीच्या काळात स्वतःच्या कंपनीचा फायदा लक्षात घेत, केवळ संरक्षण खात्याविषयी कसे प्रश्न विचारले असं सांगत, आढळराव पाटील हे लोकप्रतिनिधीच्या वेषातील व्यापारी असल्याचा आरोप केला होता. यावर आढळराव पाटीलांनी डॉ. कोल्हेंना पुरावे सादर करा, अस आव्हान दिल होत. हे आव्हान स्वीकारत डॉ. कोल्हे आढळराव पाटलांनी केवळ सरंक्षण खात्याविषयी विचारले प्रश्न जनतेसमोर मांडत आहेत.

अधिक वाचा  मविआ उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार ‘या’ तीन नेत्यांनाच; शरद पवार यांनी सांगितली रणनीती

आज, याच संदर्भातला दुसरा व्हिडीओ डॉ. कोल्हेंनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये डॉ. कोल्हे सांगतात,  डायनालॉग ही आढळराव पाटलांची जी कंपनी आहे. त्या कंपनीच्या वेबसाईटवर हे सर्व माहिती उपलब्ध आहे.

संरक्षण खात्याला विविध साहित्य पुरवणाऱ्या कंपनीचे मालक आणि तत्कालीन खासदार आढळराव पाटील यांनी  29 एप्रिल 2016 ला विचारलेला प्रश्न  या व्हिडीओत जनतेसमोर मांडला आहे.

भारत सरकारने संरक्षण खात्याला लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीचे धोरण तयार केलं आहे का? यामध्ये भारतीय कंपन्यांसाठी धोरण आहे का? आणि केलं असेल तर त्याची सविस्तर माहीती द्यावी.  असा प्रश्न आढळराव पाटलांनी विचारला आहे.

अधिक वाचा  आत्ता राज्याच्या शाळाही अदानींच्या ताब्यात?; अदानी फाऊंडेशनकडे वर्गचा शिक्षण विभागाचा जीआरही आला

या प्रश्नांचा आणि शिरुर लोकसभेचा काय संबंध याचं उत्तर आढळराव पाटलांनी द्यावं, अस, आव्हान पुन्हा एक्दम डॉ. कोल्हे यांनी केलं आहे.

चौकट

आढळराव पाटलांसाठी मत मागणाऱ्या नेत्यांनी उत्तरं द्यावीत

निवडणूक प्रचारात माझ्याबद्दल नेता की अभिनेता हा प्रश्न अनेक जण विचारतात, असे सांगत डॉ. कोल्हे म्हणाले की, आता शिवाजीराव आढळराव पाटलांसाठी मत मागणाऱ्या नेत्यांनी आता उत्तर द्यावीत की, नेत्याच्या रुपात स्वतःच्या कंपनीचे उखळ पांढर करणारा लोकप्रतिनिधी हवा, की सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणार लोकप्रतिनिधी हवा. तेव्हा आता आढळराव पाटील दिलेला शब्द पाळणार का. आणि त्यांच्यासाठी मत मागणाऱ्या नेत्यांना याची कल्पना आहे का? असे प्रतिसवाल डॉ. कोल्हे यांनी केलेत.