पवित्र रमजान महिन्याच्या औचित्य साधून कोथरूड मधील मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांची इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र भाऊ धंगेकर यांनी मुस्लिम बांधवांनी भेट घेतली. मुस्लिम बांधवांकडून इंडीया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा सत्कार करण्यात आला आणि मुस्लिम बांधवांनी धंगेकर यांना पाठिंबा जाहीर केला.

कोथरूड भागातील सर्व मुस्लिम बांधवांनी यांनी एमडीएम drug रोखण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाची प्रशंसा केली. तसेच फक्त सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह न राहता सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरती बसणाऱ्या रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी समस्त पुणेकरांनी उभे राहण्याची ही योग्य वेळ असल्याचेही यावेळी उपस्थित नागरिकांनी सांगितले. याप्रसंगी असंख्य मुस्लिम बांधव आणि शिवसैनिक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा  विशाल पाटलांना तिकीट न मिळण्याच्या खेळीतील खलनायक जयंत पाटील; ‘या’ बड्या नेत्याचा गंभीर आरोप