पुणे : महापालिके च्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिके ला दिले असून ही प्रक्रिया शुक्रवारपासून (२७ ऑगस्ट) सुरू होणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीचे रणशिंग वाजले असून पक्षपातळीवरील निवडणूक तयारीला या आदेशामुळे वेग येईल. ही निवडणूक ‘एक प्रभाग (वॉर्ड) – एक नगरसेवक’ या पद्धतीने होणार असल्याने तूर्तास एक प्रभाग दोन नगरसेवक हा मुद्याला पूर्णविराम मिळाला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड सह राज्यातील अठरा महापालिकांची मुदत फे ब्रुवारी २०२२ मध्ये संपुष्टात येणार आहे. त्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकांकरिता प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासंदर्भातील आदेश महापालिकांना दिले आहेत.

महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम, २०१९ अन्वये सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग एक सदस्याचा असेल. प्रभाग निश्चित करताना सन २०११ ची लोकसंख्या विचारात घेतली जाणार आहे. त्या दृष्टीने प्रारूप प्रभाग रचना आराखडा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महापलिकेची सन २०१७ मधील निवडणूक चार नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीने झाली होती. यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले होते. महाविकास आघाडीने ३१ डिसेंबर २०१९ रोजी बहुसदस्यीय पद्धत बंद करून एक प्रभाग एक नगरसेवक असा ठराव मंजूर के ला होता. मात्र मुंबईसाठी फक्त एक नगरसेवक एक प्रभाग ही पद्धत ठेवावी आणि अन्य महापालिकांमध्ये दोन नगरसेवकांचा एक प्रभाग असावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती. त्यावरून महाविकास आघाडीतील मतभेदही पुढे आले होते. मात्र राज्य निवडणूक आयोगाने एक प्रभाग एक नगरसेवक या पद्धतीचे आदेश काढल्याने तूर्तास वादाच्या या मुद्द्याला पूर्णविराम मिळाला आहे.

अधिक वाचा  'स्वच्छ'ला काम मिळताच साहित्य खरेदीही सुरू

सन २०११ ची लोकसंख्या विचारात घेऊन मतदारसंख्या निश्चित करण्यात यावी, मतदार याद्या तयार करण्यात याव्यात, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच अंतिम प्रभाग रचना, आरक्षण आणि सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून नंतर जाहीर के ला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या या आदेशाने पक्षस्तरावरील निवडणूक प्रक्रियेला गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एक प्रभाग २१ हजार लोकसंख्येचा

शहराची एकू ण लोकसंख्या भागिले महापालिके ची एकू ण सदस्य संख्या या सूत्राने प्रथम प्रभागाची लोकसंख्या निश्चित करण्यात येणार आहे. प्रभागाची लोकसंख्या त्या प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के कमी किं वा १० टक्के जास्त या मर्यादेत ठेवता येणार आहे. सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नाले, नद्या, डोंगर, उड्डाण पूल आदी मर्यादा विचारात घेऊन प्रभाग निश्चित करण्याची आयोगाची सूचना आहे. एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन प्रभागात करण्यात येऊ नये, दळणवळणाच्या दृष्टीने विचार करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, आदेशानुसार एक प्रभाग किमान साडेएकवीस हजार लोकसंख्येचा होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  "पवारांना अडकवण्याचाच ममतांचा डाव, काँग्रेसविरोधातही कट सुरूच"

एक सदस्यीय प्रभाग असला तरी आम्हीच विजयी होऊ

याबाबत भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी, एक, दोनची अथवा चारची प्रभाग रचना झाली तरी आगामी निवडणुकीनंतर महापालिकेत पुन्हा भाजपचीच सत्ता येणार असल्याचे सांगितले आहे़ आजचा निर्णय हा महाविकास आघाडीने राजकीयदृष्टीने घेतला आहे़ आमच्या काळात विकासाच्यादृष्टीने प्रभाग रचना करून चार नगरसेवकांचा एक प्रभाग अशी रचना करण्यात आली़ परंतु, या प्रभागरचनेत लोकांच्या हिताचा व विकासाचा विचार केलेला नाही़ तरीही भाजपने केलेल्या विकासकामांच्या जोरावर भाजप पुन्हा सत्तेत येईल व पुणेकरांची पसंतीही भाजपलाच राहील असेही ते म्हणाले़

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी, आगामी निवडणुकीच्या कामात दिरंगाई होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने जुन्या निर्णयानुसार एक सदस्यीय प्रभागाचा आदेश काढला आहे़ पण पुढील आठवड्यात राज्य सरकार वटहुकूम काढून दोन सदस्यांचा प्रभाग जाहीर करेल़ दरम्यान, प्रभाग एकचा होऊ अथवा दोनचा तो राष्ट्रवादी काँग्रेसला फायदेशीरच आहे़ पुणेकर भाजपच्या कारभाराला कंटाळली असल्याने, महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़

अधिक वाचा  एकावर एक फ्री थाळी चांगलच महागात; तब्बल ८९ हजारांचा ग्राहकाला गंडा

काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी, एक सदस्यीय प्रभाग रचना ही कार्यकर्त्यांना न्याय देणारी असल्याचे सांगितले़ ज्या कार्यकर्त्याची पकड त्याच्या मतदारसंघात आहे, अशा गरीब कार्यकर्त्यांनाही निवडणूक लढविता येणार आहे़ एक सदस्यीय प्रभागामुळे शहरातील विकासाला विशेषत: त्या प्रभागातील विकासाला नक्कीच चालना मिळेल असेही ते म्हणाले़

शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे यांनी, एक सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगून, या निर्णयामुळे शहरात शिवसेनेचे संख्याबळ नक्की वाढेल, असा विश्वास व्यक्त केला़ शहरात एक सदस्यीय प्रभाग असताना शिवसेनेचे २२ नगरसेवक होते, त्यामुळे यावेळीही पक्षाला याचा मोठा फायदा होणार आहे़ चार सदस्यीय प्रभागात काम करताना हद्दीच्या अनेक अडचणी येत होत्या़ पण आता एक सदस्यीय प्रभागात काम मार्गी लागून विकासाला चालना मिळणार आहे़.