विधीमंडळाचा आज शेवटचा दिवस असतनाच आज शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच पक्षातील हे आमदार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे आपापसांत भिडले. यावेळी भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी केली. दरम्यान याबाबत मंत्री शंभुराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

कोणताही वाद झाला नाही : शंभुराज देसाई

दरम्यान, शंभूराज देसाई यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना म्हटलं की, ‘कोणताही राडा झालेला नाही. धक्काबुक्की झाल्याचा काय पुरावा आहे. मी माध्यमांना प्रश्न विचारतो, लॉबीमध्ये माध्यमांचा कुठला कॅमेरा नाही. तरी तुम्ही कसे चालवता, असं शंभुराज देसाईंनी म्हटलं आहे. एक मंत्री आणि आमदार चर्चा करत होते. चर्चा करताना फक्त आवाज वाढला. संबंधित आमदारांना आम्ही लॉबीमध्ये घेऊन चर्चा केली. वाद झाला नाही, कुणी भिडले नाही. बोलता बोलता मोठ्या आवाजात बोलले म्हणजे वाद झाला का’, असा प्रश्न शंभुराज देसाईंनी केला आहे.

अधिक वाचा  “मोदींना मंगळसूत्राचं महत्त्व आहे? देशासाठी आईच मंगळसूत्र अर्पित आणि आजीने सोनंही दिल: प्रियांका गांधी

त्या दोन आमदारांच्या चर्चा सुरू असताना आवाज वाढला. अंगावर गेले किंवा आपापसांत भिडले अस काही नाही. विकासकामांवर चर्चा सुरु होती. बोलता बोलता थोडे मोठ्या आवाजात बोल लो तर मग काय वाद झाला का? बिलकूल वाद झाला नाही. मी दोघांना घेऊन बसलो. चर्चा केली. आमच्यात खेळीमेळीचे वातावरण आहे. अपुऱ्या माहितीच्या आधारे काही चालवणे योग्य नाही. खात्री करायला हवी. मी कामकाज सोडून तुम्हांला वस्तुस्थिती सांगायला आलो, असंही ते पुढे बोलताना म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले होते, त्यावेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर शिंदे गटातले आमदार त्यांच्यासोबत होते. त्यानंतर मुख्यमंत्री सभागृहामध्ये गेले, त्यावेळी लॉबीमध्ये महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्येही धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्या कारणावरून हा वाद झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही.

अधिक वाचा  LIVE मॅचमध्ये राडा; हार्दिक पांड्याच नाव घेताच चाहत्याला लाथा-बुक्क्यानी मारहाण

विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ कामकाज एक तासासाठी तहकूब

राज्याचे मंत्री दादा भुसे आणि शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधानभवनात बाचाबाची झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित करत याबद्दल खुलासा करण्याची मागणी केली. या घटनेनबद्दल तपासून माहिती घेतली जाईल असं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. तसंच तोपर्यंत अर्थसंकल्पावरील चर्चेला मंत्री केसरकर उत्तर देतील असं त्या म्हणाल्या मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही यावेळी उपसभापती आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली आणि उपसभापतींनी उद्विग्न होऊन कामकाज एक तासासाठी तहकूब केलं आहे.