पक्ष चिन्ह आणि नाव निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाने नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर आता शरद पवार गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. त्यामध्ये वडाचं झाड, कपबशी, आणि शिट्टी यांचा समावेश आहे.

अधिक वाचा  …असे झाले तर देशात आग लागणार ; काँग्रेसच्या आरोपावर अण्णा हजारे यांचे वक्तव्य