मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यांच्या नाशिकच्या कार्यालयात हे पत्र आलं होतं. 5 जणांनी त्यांची सुपारी घेतली असल्याचं या पत्रात नमूद केलं आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात गाजत आहे. त्यामुळे त्याचं वादातून त्यांना ही धमकी आल्याचं समजत आहे.

सावध राहाचा इशारा…

मराठा आरक्षणाचा विरोध करत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांचा रोष स्वतःवर ओढावला आहे. याच वादातून मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मारण्याची धमकी आल्याचा प्रकार समोर आला आहे. रुपये 50 लाख घेऊन पाच जणांनी तुम्हाला जीवे मारण्याची सुपारी घेतली आहे. त्यात एक मराठा लाख मराठा पोलिस असा उल्लेख देखील केला आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही बाहेर फिरू नका हे पाच लोक तुमच्या शोधात आहेत असा सावधगिरीचा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

अधिक वाचा  भाजपचे Google वर जाहिरातीसाठी 100 कोटी खर्च;  २६ टक्के वाटा २ लाख १८ हजार कंटेंटपीस प्रसिद्ध

पोलीस सुरक्षेत वाढ करण्याची मागणी

मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांची पोलिस सुरक्षा वाढवावी ही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. भुजबळ यांना या आधी देखील जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यावेळे पासून त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. आणि आता पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे त्यांची सुरक्षित कदाचित वाढ होण्याची शक्यता आहे.

सलग दुसऱ्यांदा धमकी

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अशी त्यांची मागणी आहे. मराठा समाजास वेगळे आरक्षण देण्यास आपला विरोध नसल्याचे ते सांगत आहे. आपली भूमिका मांडण्यासाठी ते ओबीसी समाजाच्या सभा घेत आहेत. राज्यात एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या दौराचा चौथा टप्पा सुरु झाला आहे.

अधिक वाचा  सेम टू सेम एटीएम कॅशची गाडी मध्यरात्री कोट्यवधींची रोकड पकडली; निवडणूक काळात ४३१.३४ कोटी जप्त

भुजबळ यांनीही दोन सभा राज्यात घेतल्या आहेत. त्या सभेतून ते मराठा आरक्षणाविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे भुजबळ यांना गेल्या काही दिवसांपासून धमक्या मिळत आहे. त्यांच्या दौऱ्यांना विरोध होत आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी आले असताना त्यांना धमक्यांचे मेसेज आले.