1. हडपसर (प्रतिनिधि) : स्री शिक्षणाची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त हडपसर गांधी चौक येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

याप्रसंगी पंढरपूर ते घुमान पंजाब 2700 किलोमीटरचा सायकल वारी करून संतांच्या विचाराचा प्रसार करणाऱ्या श्री जनार्दन शिवरकर व श्री अशोक चौधरी यांचा सन्मान अर्जुनराव बनकर प्रतिष्ठानच्या वतीने माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर व महेंद्र बनकर यांच्या हस्ते करण्यात आला.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हडपसर यांची कर्मभुमी असल्याकारणाने शासनाने हडपसर मध्ये सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक करावे अशी मागणी हडपसर मधील सर्व संस्थांनी याप्रसंगी केली.

अधिक वाचा  बारामती मतदारसंघात खडकवासल्यात दिवसभर तणाव अन् मध्यरात्री हवेत गोळीबार; पोलिसांचा पाठलाग पण आरोपी भरार

*सत्यशोधक* या चित्रपटाचे पोस्टर्सचे प्रमोशन यावेळी या.राजयमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या हस्ते सर्व संस्थांच्या वतीने करण्यात आले,यावेळी सूत्रसंचालन सतीश भिसे व स्व.इंदुबाई वाडकर स्मृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष मुकेश वाडकर यांनी केले तर आभार बनकर प्रतिष्ठानचे महेंद्र बनकर यांनी केले.यावेळी याप्रसंगी मा.नगरसेवक विजय देशमुख,सुनील बनकर,सुभाष जंगले,जीवन जाधव, दिलीप तुपे,गणेश फुलारे बाळासाहेब हिंगणे, पांडुरंग माटे,विवेक तुपे जयप्रकाश जाधव,शितल संजय शिंदे,पल्लवी प्रशांत सुरसे, विद्या होडे मीना थोरात सीमा शेंडे मनीषा राऊत, तृप्ती अनिल टिळेकर वावळ, दिपाली माटे,विक्रम आल्हाट विवेक आल्हाट, सतीश आल्हाट सचिन आल्हाट विलास शेलार महादेव वाघमोडे हनुमंत मेटे नंदू ननवरे, महेश बनकर सुधीर होले डॉ. किशोर सहाणे, बाबा बनकर,ठकसेन सातव,चंद्रकांत टिळेकर, विशाल बोरावके, विश्वास कावरे जयप्रकाश जाधव,महेश टेळे,बबन जगताप,निलेश म्हैसणे,गणेश वाडकर,एडवोकेट गदादे, मच्छिंद्र वाडकर, पोपट वाडकर,महेश पवार,रमजान शेख तसेच *स्व. अर्जुनराव बनकर स्मृती प्रतिष्ठान,हडपसर,चर्मकार संघ, इंदुबाई वाडकर स्मृती प्रतिष्ठान,धनगर उन्नती मंडळ,हडपसर पथारी पंचायत, संभाजी ब्रिगेड,सिद्धार्थ बुद्ध विहार,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद हडपसर या सर्व संस्थांचे पदाधिकारी ,सदस्य यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते