डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) यांनी आयोजित केलेल्या लो. अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलन २०२४ चे आज ऊद्घाटन ज्येष्ठ साहित्यकार “ पानिपतकार” विश्वास पाटील यांचे हस्ते बालगंधर्व पुणे येथे झाले. यावेळी व्यासपीठावर बार्टीचे महासंचालक श्री. सुनिल वारे, पद्मश्री. गिरिश प्रभुणे, राज्याचे समाजकल्यान उपायुक्त श्री. डोके साहेब, बार्टीच्या निबंधक सौ. ईंदिरा अस्वार, मा. मच्छींद्र सकटे, श्री. विजयबापु डाकले, श्री. अशोक लोखंडे, श्री. भगवानराव वैराट, श्री, बाळासाहेब भांडे, श्री. अंकल सोनवणे, श्री. संपत जाधव आदी ऊपस्थित होते.

संमेलनाची सुरुवात सकाळी ग्रंथदिंडीने झाली. प्रमुख मान्यवर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने यात सामिल झाले होते. बालगंधर्व कलादालनातील चित्र प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होते. मोठ्या ऊत्साहात व गर्दीच्या ऊच्चांकाने हे संमेलन पार पडले.

अधिक वाचा  चांदणी चौक दिगंबर जैन मंदिरामध्ये श्रमण संस्कृती संस्कार शिबीर चे आयोजन