दिनांक 22 ते 26 ऑक्टोबर दरम्यान नोएडा येथे या स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेमध्ये भारतातील सर्व राज्यतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला.तसेच दुबई व UAE मधील शाळांनी सुद्धा सहभाग नोंदवला.

या स्पर्धे मध्ये 14 वर्षे खालील 40 किलो वजन गटात संस्कृती कडू हिने रौप्यपदक प्राप्त केले.ती श्री श्री रवीशंकर विद्यामंदिर भुगांव 8वी मध्ये शिकत आहे. संस्कृती हिने हरियानाच्या हर्षित, पंजाबच्या देवसरी, तर केरळच्या जाहिब अख्तर ला ईओपॅन शिवनागे या डावावर पूर्ण गुण घेऊन त्यांचा पराभव केला, तर सेमिफायनल ला तिने दिल्लीच्या अंजल कुमार हिचा एका मिनिटातच पराभव केला.फायनल ला गुजरात च्या इशिका बरोबर अटीतटीच्या सामन्यात तिला पराभव पत्करावा लागून रौप्यपदका वर समाधान मानावे लागले.

अधिक वाचा  T20 इंटरनॅशनलमध्ये बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; रोहमालियाने आपल्या डेब्यु मॅचमध्ये कमाल केली

श्री श्री रवीशंकर विद्यामंदिर भुगाव च्या मुख्याध्यापक संगीता दास मॅडम यांनी तिचे अभिनंदन केले,तर शाळेचे क्रीडा शिक्षक श्रीअमोल व प्रशांत सर यांचे तिला मार्गदर्शन लाभले
तसेच किर्स्टल क्लब व दयानंद धाडवे सर यांच्याकडे ती रेगुलर प्रॅक्टिस करते.