राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांना आज (11 ऑगस्ट) जामीन मिळाला असून यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना सर्वांच्या भुवया उंचावणारं वक्तव्य केलं आहे.

नवाब मलिकांना जामीन मंजूर, पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर आरोप

नवाब मालिकांना जामीन देण्यामागे राजकारण असल्याचा संशय पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तर नवाब मालिकांना राजकीय दबाव आणून भूमिका घ्यायला भाग पाडले असावे असा राजकीय संशय असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. तर सीबीआय आणि ईडीच्या यंत्रणांनी आता जामिनाला विरोध का केला नाही? याआधी त्यांनी विरोध केला होता. पण आताच विरोध का केला नाही? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच नवाब मलिक यांचा आता कोणत्या गटाला पाठिंबा आहे? ते लक्षात घेऊन देखील जामिनाबाबत आम्हाला संशय वाटतो आहे. असे गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केले आहेत.

अधिक वाचा  अजितदादांनी आबांचा किस्सा सांगितला, एकही जण भेटायला आला नाही…पद गेल्यावर कोण विचारत नाही!

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत असलेल्या मलिकांना अखेर जामीन मिळाला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आज मलिकांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला. मात्र, हा दिलासा तात्पुरतात असणार आहे. माजी अल्पसंख्याक मंत्री ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती. फेब्रवारी 2022 मध्ये नवाब मलिकांना ईडीने अटक केली होती. तब्बल 17 महिन्यानंतर मलिक तुरुंगातून बाहेर येणार आहे.

नवाब मलिकां यांना तात्पुरता दिलासा
नवाब मलिक यांना दीड वर्षानंतर दिलासा मिळाला असला, तरी तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. सुप्रीम कोर्टाने मलिकांना 2 महिन्यांसाठीच जामीन दिला आहे. जामीन वाढवून घेण्यासाठी मलिकांना पुन्हा कोर्टात धाव घ्यावी लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने त्यावेळी जर मागणी फेटाळली, तर मलिकांना पुन्हा तुरुंगात जावे लागेल.

अधिक वाचा  पुण्यात धंगेकरांसाठी रणानिती बदलली; १२ आमदारांचा तळ अन् आत्ता या 4जमेच्या बाजूसाठी ‘कानडी’ही सक्रिय

मलिकांचं प्रकरण काय?
देवेंद्र फडणवीस यांनी 2022 मध्ये नवाब मलिकांविरुद्ध पहिल्यांदा आरोप केले होते. नवाब मलिकांनी 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावली खान आणि सरदार पटेल याच्याकडून कुर्ला येथे जमीन विकत घेतली. यासाठी 55 लाख हसीना पारकरला दिले गेले, असे फडणवीस म्हणाले होते. या पैशांचा वापर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी केला गेल्याचा आरोप आहे. त्यानंतर या प्रकरणाचा एनआयए आणि नंतर ईडीने तपास सुरू केला होता. याप्रकरणी NIA ने FIR 3 फेब्रुवारीला दाखल केली होती त्यानंतर भादंवि कलम 17, 18, 20, 21, 38 आणि 40 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीने या प्रकरणी चौकशी सुरू केली होती. नंतर ईडीने मलिकांना अटक केली होती.