कामगार नेते डॉ. दत्ता सामंत हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अंडर वर्ल्ड डॉन छोटा राजनची दत्ता सामंत हत्या प्रकरणातून सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या खटल्यातील तो एकमेव आरोपी होता. यापूर्वी दोन आरोपींना न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. विशेष सीबीआय न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी हाय-प्रोफाइल डॉक्टर दत्ता सामंत खून खटल्यातील गुंड छोटा राजनची “पुष्टीकारक पुराव्याअभावी” सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.

दत्ता सामंत हत्या प्रकरणात पुराव्या अभावी गँगस्टर छोटा राजन सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. दत्ता सामंत हे कामगार नेते होते. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष CBI कोर्ट न्यायाधीश ए एम पाटील यांनी हा निकाल दिला आहे. प्रमाणित पुराव्यांच्या अभावी राजेंद्र निकाळजे अर्थात छोटा राजन निर्दोष सुटला आहे.

अधिक वाचा  खरंच पवार कुटुंबात फूट का? सुळेंचं ते ‘स्टेटस’ खरं? अजितदादाचे अजब उत्तर; .. नवंही नाही अन् विशेषही नाही

16 जानेवारी 1997 रोजी डॉक्टर दत्ता सामंत पवई ते घाटकोपर च्या पंतनगर येथे जात असताना पद्मावती रोडवर त्यांच्यावर हल्ला झाला होता. पोलिसांच्या माहितीप्रमाणे 4 अज्ञात आरोपी बाईकवर आले होते. त्यांनी दत्ता सामंत यांची गाडी रोखली आणि त्यांच्यावर जवळपास 17 गोळ्या फायरिंग करून निघून गेले होते.