ज्ञानवापी मशीदीच्या ASI सर्व्हेच्या प्रकरणात महत्वाची अपडेट आली आहे. यामध्ये हे सर्व्हेक्षण करायचं की नाही याचा फैसला ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. आलाहाबाद हायकोर्टानं ३ तारखेपर्यंत आपला निकाल राखून ठेवण्यात आला आहे. तोपर्यंत या सर्व्हेला स्थगिती कायम राहणार आहे.

याप्रकरणी अंजुमन इंतेजामिया मस्जीद कमिटीनं वाराणसी जिल्हा कोर्टाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात आव्हान दिलं होतं. जिल्हा कोर्टानं २१ जुलै रोजी ज्ञानवापी मशीद परिसराच्या ASI सर्व्हेचे आदेश दिले होते.

ज्ञानवापी मशीद परिसर हा वाराणसीत काशी विश्वनाथ मंदिराच्या पुढेच स्थित आहे. त्यामुळं या मशीदीच्या जागी पूर्वीच्या काळी मंदीर अस्तित्वात होतं, त्यामुळं आम्हाला सध्याच्या मशीदीत पुजेची परवानगी देण्यात यावी अशी मागणी ४ हिंदू महिलांनी केली होती. त्यानंतर हे प्रकरण वाराणसी जिल्हा कोर्टात गेलं. त्यानंतर कोर्टानं ज्ञानवापी मशीद परिसराचं भारतीय सर्वेक्षण विभागाद्वारे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.

अधिक वाचा  ‘…त्यामुळे या चुका सुधारायला हव्या’; सामना गमावल्यानंतरही चेहऱ्यावर स्मितहास्य कायम, हार्दिक काय म्हणाला?

पण वाराणसी जिल्हा कोर्टाच्या या आदेशांविरोधात अंजुमन मशीद कमिटीनं आलाहाबाद हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टानं या सर्वेक्षणाला आजपर्यंत स्थगिती दिली होती. त्यानंतर आज यावर पुन्हा सुनावणी झाली त्यानंतर हायकोर्टानं या सर्वेक्षणाला ३ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली. तसेच यावरील निर्णय राखून ठेवला आहे.