चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा वादात सापडल्याचं बोललं जात आहे. जडेजाने केलेलं एका ट्विटमुळे हे प्रकरण आणखी चर्चेत आला आहे. आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर धोनी आणि जडेजाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आला. या व्हिडीओमध्ये दोन्ही खेळाडू एकमेकांशी वाद घालताना दिसत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

धोनी आणि जडेजामधील वाद चिघळला?
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता जडेजानं केलेलं ट्विट या वादाशी जोडलं जात आहे. जडेजानं हे ट्विट धोनी आणि त्याच्यातील वादामुळे केलं असल्याचं बोललं जात आहे. जडेजाच्या या ट्विटचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, या ट्विटवर जडेजाला त्याची पत्नी रिवाबा हिचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे धोनी आणि जडेजाच्या वादात त्याची पत्नी रिवाबा हीचीही एन्ट्री झाली आहे.

अधिक वाचा  कोथरूडमधील थुंबरे पार्क सोसायटीच्या बेसमेंटमध्ये गटाराचे पाणी शिरले; रहिवाशांमध्ये संताप

नेमका वाद कशावरून?
सध्या सुरु असलेल्या आयपीएल 2023 मध्ये शनिवारी चेन्नई सुपर किंग्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा 77 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विराट विजयासह चेन्नई संघाला प्लेऑफचं तिकीट मिळालं. दिल्ली विरुद्ध चेन्नई सामन्यात जडेजाला काही खास कामगिरी करता आली नाही. जडेजाची अत्यंत खराब कामगिरी करत चार षटकांच्या गोलंदाजीत 50 हून अधिक धावा दिल्या. धोनी आणि जडेजा यांच्यात यावरून वाद झाल्याचा अंदाज बांधला जात आहे.

रविंद्रची पत्नी रावीबाचं ट्विट चर्चेत
इतकंच नाही, तर आता हा वाद अधिकच चिघळला असल्याचंही बोललं जात आहे. जडेजाने नुकतच एक ट्विट करत लिहिलं आहे की, “तुमचं कर्म तुमच्याकडे परत येतं. आज किंवा उद्या. पण ते येणार हे निश्चित आहे.”

अधिक वाचा  अहमदाबाद अपघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन, ३ महिन्यांत येणार अहवाल

वादात जडेजाच्या पत्नीची एन्ट्री
मीडिया रिपोर्टनुसार, रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जडेजाच्या पत्नीनं त्याचं समर्थन केलं आहे. रिवाबाने ट्विट करत लिहिलं आहे की, “तुम्ही तुमचा मार्ग अवलंबला पाहिजे.”

याआधीही जडेजाचं ट्वीट वादात
मात्र, रविंद्र जडेजाचे ट्वीट वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी चेन्नई संघ आणि रविंद्र जडेजा यांच्यातील संबंध बिघडले होते. रविंद्र जडेजाला हंगामात मधेच कर्णधारपदावरून हटवण्यात आलं होतं. यानंतर जडेजाने सोशल मीडिया हँडलवरून चेन्नई संघासंबंधित सर्व पोस्ट हटवल्या होत्या.

आयपीएलच्या लिलावापूर्वी रविंद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्स सोडणार असा अंदाज बांधला जात होता. पण, तसे झाले नाही आणि जडेजा या वर्षीही चेन्नई संघाकडून खेळताना दिसत आहे.

अधिक वाचा  १९८३ पासून पुणे पोलिसांकडून १९ एन्काउंटर; संघटित गुन्हेगारीविरोधात कठोर पावले