2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील न्यायालयाने परवानगी दिली आहे. 10 जून 2020 रोजी भारताने 62 वर्षीय राणाला प्रत्यार्पणाच्या उद्देशाने तात्पुरती अटक करण्याची मागणी करत तक्रार दाखल केली. बायडेन प्रशासनाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला पाठिंबा दिला आणि त्याला मान्यता दिली.

16 मे रोजीच्या 48 पानांच्या आदेशात, कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टसाठीच्या जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश जॅकलिन चूलजियन यांनी सांगितलं की, सुनावणीच्या वेळी युक्तिवादासाठी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांचे न्यायालयाने पुनरावलोकन केले आणि त्यावर विचार केला. ज्या गुन्ह्यांसाठी त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती करण्यात आली आहे, त्या गुन्ह्यांसाठी 62 वर्षीय राणा प्रत्यार्पण करण्यायोग्य असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे, असं न्यायाधीशांनी सांगितलं.

अधिक वाचा  मागच्या जन्मात मी बंगालमध्ये जन्मलो असेल… पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं असं का म्हणाले?