केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची कायदा मंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता अर्जुनराम मेघवाल ही जबाबदारी सांभाळतील. रिजीजू यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, राजस्थान निवडणुकीच्या तोंडावर हा बदल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, अर्जुनराम मेघवाल हे राजस्थानमधील एक मोठे नेते म्हणून परिचित आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्यास मंजुरी दिली आहे. अर्जुन राम मेघवाल, राज्यमंत्री यांनी किरेन रिजिजू यांच्या जागी त्यांच्या विद्यमान खात्यांव्यतिरिक्त कायदा आणि न्याय मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार सोपवला. किरेन रिजिजू यांच्याकडे भूविज्ञान मंत्रालयाचा पोर्टफोलिओ सोपविला जाईल. असी माहिती राष्ट्रपती भवनने दिली आहे. २०२४ लोकसभा निवडणूका तोंडावर आल्यात. त्याआधी महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका ही पार पडणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली रननीति आखण्यास सुरुवात केली आहे.

अधिक वाचा  अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस पुण्यात सोसायटीत राडा; महिलांना केस ओढत मारहाण व्हिडिओ आता समोर

कोण आहेत मेघवाल?

अर्जुन राम मेघवाल हे सध्या संसदीय कार्य आणि सांस्कृतिक मंत्री आहेत. त्यांच्याकडे आता कायदा आणि न्याय विभागाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. मेघवाल हे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी होते. ते मूळचे राजस्थानचे आहेत. राजस्थानमधील एक मोठे नेते म्हणून ते परिचित आहेत. बिकानेर आणि फिलीपाईन्समधून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी एमए, एलएलबी आणि एमबीएच्या पदव्या घेतलेल्या आहेत.