कोथरूड येथील प्राचीन ललित कला प्रबोधिनीच्यावतीने घेतलेल्या श्री अष्टविनायक संगीत महोत्सवात चिमुकल्यांचे गायन वादन झाले. यावेळी साठ बाल कलावतांनी आपल्या कलेचे बहारदार सादरीकरण केले. या संगीत हार्मोनियम, तबला आणि बासरीच्या जुगलबंदीने महोत्सवात चांगलीच रंगत आणली. बाल कलावंतांच्या ताल कचेरीने रसिक मंत्रमुग्ध झाले होते.गांधीभवनमध्ये झालेल्या या महोत्सवाला मनपाचे सहायक प्रशासकीय अधिकारी सुरेश उचाळे, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल सुभेदार व साहित्यिक डॉ. शिरीष सुमंत उपस्थित होते.

युवा बासरी वादक डॉ. आशुतोष जातेगावकर यांचे हस्ते सरस्वती पूजन झाले. संस्थेचे अध्यक्ष, संगीतकार जयराम जोशी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. संगीत विशारद पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या मयुरा मुळे, हिमानी सुमंत, स्वराली जोशी, अपूर्वा धर्माधिकारी, रोशनी देवकर यांचा सत्कार झाला.

अधिक वाचा  मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी ‘बौद्ध भन्तेंकडून बुद्ध वंदना आणि धम्मदेसना’ अभिवादनासाठी उसळला जनसागर

यावेळी निनाद वाणीचे बासरी वादन, दर्श वसईकर, मयुरेश माझिरे, अनिरुद्ध जलवादी यांचा तबला सोलो, आर्य ढोर्लेकर व मयुरेश जोशी यांची तबला जुगलबंदी, श्लोक श्रोत्री व निशांत रायरीकर यांची बासरी जुगलबंदी, स्वरश्री जोशी हिचा हार्मोनियमवरील राग मालकंस याला रसिकांनी उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद दिला, स्माही खुपेरकर, नारायणी पागे, नक्षत्रा शिंदे, सानवी माळी यांनी बालगीते गायली. सनत पंडित, आर्या भागवत, नक्षत्रा पालशेतकर यांनी बासरीवर राग भूप, राग देस वाजविला. श्रीयश जोशी, शौर्य भंडारी, सार्थक शेडगे, ईशान हिरळीकर यांच्या हार्मोनियमच्या विविध रागाने मैफीलीची रंग वाढवली.

अधिक वाचा  पुणे पालिकेला फुले वाडा स्मारकासाठी फटकारल्यावर जाग; 3 महिन्यांत ८०१ मागण्या समजून अहवाल करण्याच्या सूचना

सृजन सातव, शर्वरी भंडारी, देवव्रत मराठे, देवेन चोरगे, ओवी पानसरे, अदीश्री पाटील, अर्पित व अर्चित कोंढाळकर, श्रेयस नेमाडे, मानव पाटील, सोहम दातीर, आयान मुखर्जी, समृध्दी शेडगे, कार्तिक पानसरे यांच्या गायन, वादनाला टाळ्यांची दाद मिळाली.

महोत्सवाची सांगता चित्तवेधक ताल कचेरीने झाली. चिमुकल्यांनी ढोलकी, तबला, घटम, पखवाज यांची रंगतदार जुगलबंदी सादर केली. सूत्रसंचालन स्वाती जोशी यांनी केले.
ऋषिकेश जाधव, वसंत भरम, श्रुती धोडपकर, अर्चना गौरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.