एखाद्या वास्तविक घटनेवर आधारित चित्रपट तयार केला की, तो वादात अडकणं यात काही नवीन नाही. आत्तापर्यंत शेकडो चित्रपट काहीना काही कारणांमुळे वादग्रस्त ठरले आहेत. सध्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या 5 मे रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच हा चित्रपट वादात अडकला असून, रिलीज डेट जसजशी जवळ येत आहे, तसतसा हा वाद वाढत आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाप्रमाणेच ‘द केरळा स्टोरी’ या चित्रपटाबाबतही अनेक सामाजिक आणि राजकीय प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

अधिक वाचा  घरामध्ये एका रक्ताची चार माणसं तिथेही भांड्याला भांडं; ‘सरकारमध्ये तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे..’; चंद्रकांत पाटील

सहा दिवसांपूर्वी म्हणजेच 26 एप्रिल रोजी रिलीज झालेला ‘द केरळा स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर आतापर्यंत 1.4 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. एका गटाच्या मते हा चित्रपट एक प्रोपोगंडा फिल्म आहे तर दुसऱ्या गटाच्या मते यातून केरळमधील वास्तव परिस्थिती दाखवण्यात आली आहे. ‘द केरळ स्टोरी’च्या ट्रेलरमध्ये ब्रेन वॉश, लव्ह जिहाद, हिजाब आणि आयएसआयएससारखे शब्द वापरण्यात आले आहेत. असा दावा करण्यात आला आहे की, केरळमधील 32 हजार बेपत्ता हिंदू आणि ख्रिश्चन मुलींची ही कथा आहे. ज्यांचं ब्रेनवॉश करून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडलं गेलं आणि नंतर त्यांना आयएसआयएसचं दहशतवादी बनवलं गेलं.

अधिक वाचा  Free Haircut for Differently abled & Orphaned Children by Symbiosis Beauty and Wellness Students

हा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाच्या कथेबाबत काही प्रश्न निर्माण झाले आहेत. केरळमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन मुली व महिलांना खरोखर फूस लावण्यात आली आहे का? 32 हजार हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना खरोखर आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत भरती करून घेतलं आहे का? असे हे प्रश्न आहेत.

ट्रेलरमध्ये काय दाखवण्यात आलं?

‘द केरळा स्टोरी’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मल्याळम अभिनेत्री अदा शर्मा मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात अदानं शालिनी उन्नीकृष्णन नावाच्या हिंदू कुटुंबातील मुलीची भूमिका साकारली आहे. काही लोक शालिनीचं धर्मांतर करतात आणि तिला फातिमा नावानं नवीन ओळख देतात, असं ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.

अधिक वाचा  लाडकी बहीण योजनेत आठ लाख महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये मिळणार

बुरखा घातलेली फातिमा आपली गोष्ट सांगताना दिसत आहे. ती म्हणते, “मी हिंदू होते. माझं नाव शालिनी उन्नीकृष्णन होतं. आता मला फातिमा या नावानं ओळखलं जातं. मला नर्स व्हायचं होतं. पण आता मी अफगाणिस्तानात आयएसआयएसच्या एका दहशतवादी तुरुंगात आहे. माझ्यासारख्या 32 हजार मुली आहेत ज्यांचं धर्मांतरकरून सीरिया आणि येमेनमध्ये पाठवण्यात आलं आहे. सर्वसामान्य मुलींना दहशतवादी बनवण्याचा धोकादायक खेळ केरळमध्ये उघडपणे सुरू आहे.”