पुण्यातील पिरंगुट घाटात भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने पाच दुचाकींना धडक दिली आहे. या अपघातात सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी अपघाताची भीषणता तीव्र होती. या अपघाताचे सीसीटिव्ही फुटेज झी 24 तासच्या हाती लागले आहे.

पुणे मुळशी रोडवर पिरंगुट घाट उतारावरून पौडच्या बाजूला सिमेंटच्या विटा घेऊन जाणाऱ्या टेम्पोने सात वाहनांना धडक दिली. 18 नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली असून आता याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. टेम्पोने सहा दुचाकी आणि एका चार चाकी वाहनाला धडक दिली आहे.

अधिक वाचा  मतदारांच्या नावाने बोगस व्यक्तीकडून मतदान, शिरुरमध्ये धक्कादायक प्रकार

टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत गोविंद लाल या टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात एका डॉक्टरांचाही समावेश आहे.