मुंबईः पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मतदारांना ऑनलाईन आवाहन केलं. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा आणि हुकूमशाहीला रोखा, असं ठाकरे म्हणाले.

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असं अनेकांना वाटत होतं. परंतु बिनविरोधी निवडणुकीतला मोकळेपणा आता उरलेला नाही. भाजपमुळे इतर ठिकाणी पोटनिवडणुका झालेल्या आहेत आणि तसंही टिळक कुटुंबियांना भाजपने डावललं आहे. त्यामुळे भाजपचा वारु आवरण्यासाठी कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. निवडणूक आयोगाने शिवसेनेविषयी दिलेल्या निर्णयावर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही आमचा धनुष्यबाण चोरला आहे, पण आमच्याकडे मशाल आहे. तुम्ही चोरलेला धनुष्यबाण घेऊन या आम्ही मशाल घेऊन येतो, मग बघू. पण सध्या कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साथ द्या, असं आवाहन त्यांनी केलं.

अधिक वाचा  कांदा निर्यातबंदी केंद्रानं खरंच उठवली की फक्त निवडणूक जुमला? केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे हे प्रसिद्धीपत्रक

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे-

बिनविरोध निवडणुकीतला मोकळेपणा आता शिल्लक राहिलाय का?

कसबा आणि चिंचवडमधली निवडणूक दुर्दैवाने आली आहे

मात्र कुटुंबियांव्यतिरिक्त इतरांना उमेदवारी दिल्याने निवडणूक होत आहे

गिरीश बापटांना ऑक्सिनजनच्या नळ्या नाकात असतांना प्रचाराला बोलावलं

का कुठला अमानूषपणा? ही कुठली लोकशाही?

गद्दारांशी लढा देण्यासाठी जनता माझ्यासोबत आहे

महाविकास आघाडी एकत्र आल्यानंतर चिन्ह चोरलं, नाव चोरलं, पक्ष फोडला आहे.

आता भाजपला सहानुभूती दाखवण्याची गरज नाही

देशाला हुकूमशाहीपासून वाचवाचयं असेल तर…

भाजपचं जे काही चाललंय त्यामुळे नाईलाज म्हणून ही निवडणूक जिंकावीच लागेल.

अधिक वाचा  सलग 25 फ्लॉपनंतर अक्षय कुमारच्या बुडत्या करिअरला सावरू शकणार का प्रियदर्शन? पुन्हा एकत्र

चौकशा लावताय ना? ४०० कोटींचा महाप्रसाद कुठल्या गुत्तेदाराला दिला, त्याचीही चौकशी करा.

टिळक घराण्याचा वापर करुन फेकून दिलं.

आमचे शहरप्रमुख अॅड. सचिन भोसलेंवर हल्ला झाला, ही तुमची लोकशाही आहे का?

नाथाभाऊंची का तुम्ही शिकार करताय? मात्र जे तुमच्याकडे आले त्यांच्या चौकशा बंद झाल्या.

आज कसब्यात काँग्रेस आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी करा.

आपल्या देशाला हुकूमशाहीपासून वाचवायचं असेल तर मविआ उमेदवारांना विजयी करा.