महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या शुभहस्ते स्वराज्य रक्षक संभाजी महाराज रिक्षारथाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयात करण्यात आले. हिवाळी अधिवेशनात अजितदादांनी ठामपणे केलेले वक्तव्य छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते धर्मवीर नव्हते या भूमिकेमुळे दादांना सत्ताधारी पक्षाने खूप ट्रोल केले होते, व माफी मागा असे आवाहन केले परंतु दादा आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले आणि छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच आहेत मी माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका घेतली व याच भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी पुणे शहरभर स्वराज्य रक्षक असा मजकूर असणारी पोस्टर्स पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माननीय श्री आनंद उर्फ बंडूशेठ तांबे यांच्या वतीने शंभर रिक्षांना लावण्यात येणार आहेत.

अधिक वाचा  नाशिकमध्ये अर्ज भरुन खळबळ उडवणाऱ्या शांतीगिरी महाराजांची संपत्ती किती? वाढीचा वेग डोळे विस्फारतील 

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अशा प्रकारचे पोस्टर लावलेल्या रिक्षाचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्ष नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री प्रशांत दादा जगताप महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते प्रदीप दादा देशमुख , युवक अध्यक्ष किशोर कांबळे,दयानंद इरकल , बापू डाकले मानिक शेठ दुधाने,विजय रवळे , बसंतकुमार भाटिया ,स्वप्निल थोरवे,राहुल तांबे व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते या सर्वांचे आभार पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आनंद उर्फ बंडू शेठ तांबे यांनी मांनले