मुंबईः गुजरातला लागून असलेल्या महाराष्ट्राने शेजारील राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्याच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये काम करणाऱ्या गुजरात विधानसभेच्या मतदारांना एक दिवसाची सुट्टी देणारा जीआर जारी केला आहे.त्यात पालघर, नाशिक, नंदुरबार आणि धुळे या महाराष्ट्रातील सीमावर्ती जिल्ह्यांतील कंपन्यांना एक दिवस सुट्टी द्यावी लागेल, असे परिपत्रकात म्हटले आहे.तसेच सर्व खासगी कंपन्यांना त्याचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.

तसेच 4-6 जानेवारी 2023 रोजी मुंबईत जागतिक मराठी संमेलन आयोजित करण्याबाबत महाराष्ट्र सरकारने एक जीआरही जारी केला आहे. त्यासाठी राज्यातील आणि देशातील मराठी आणि महाराष्ट्राशी संबंधित सर्व संस्थांना आमंत्रित करण्यात येत असून महाराष्ट्राची शान असलेल्या या संमेलनात राज्यातील बड्या व्यक्तींचा सहभाग अपेक्षित आहे.गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 48 तासांत 8 सभा घेतल्या. यानंतर 23 नोव्हेंबरला ते पुन्हा गुजरातमध्ये दणक्यात प्रचार करणार आहेत. पीएम मोदींच्या या निवडणूक रॅली पूर्वीच्या रॅलींपेक्षा वेगळ्या होत्या. या रॅलींमध्ये त्यांनी प्रामुख्याने भाजपसाठी 5 लक्ष्य ठेवले आहेत.

अधिक वाचा  सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचं गुजरात कनेक्शन असल्याची माहिती समोर