जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी काही वेळापूर्वी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. गेल्या 22 वर्षात नितीश कुमार हे आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, जे 2014 मध्ये सत्तेवर आले, ते 2024 मध्ये विजयी होतील का? 2024 साठी सर्व (विरोधक) एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे. मी अशा कोणत्याही पदाचा (पंतप्रधान पदावर) दावेदार नाही.

त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता ते म्हणाले की, 2024 मध्ये आम्ही असू किंवा नसू पण, 2014 वाले नसतील. नितीश कुमार यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावरही हातवारे करत निशाणा साधला. म्हणाले, ज्यांना वाटतं की विरोध संपेल, तर आम्ही आधीच विरोधात आलो आहोत.

अधिक वाचा  मतमोजणीपूर्वीच भाजपने खाते उघडले, आतापर्यंत निवडणुकांमध्ये किती खासदार झाले बिनविरोध

भाजप पक्षाकडून जेडीयूत फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करून नितीश कुमार यांनी भाजपशी असलेली युती तोडली. काल आमदार आणि खासदारांची बैठक घेऊन त्यांनी चर्चा केली. त्यात भाजपसोबतची युती तोडण्याचा निर्णय झाला. त्यानंतर नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी राज्यपालांची भेट घेऊन बहुमताचा आकडा सादर केला. त्यानंतर आज राजभवनात छोटेखानी समारंभात या दोन्ही नेत्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यावेळी दोन्ही पक्षाचे आमदार उपस्थित होते.

2000मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. त्यावेळी ते अवघे सात दिवसच मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी नंतर कधी मागे वळून पाहिलं नाही.