मुळशी तालुका येथील शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती बाजीराव पासलकर यांचे आराध्य अन नवसाला पावणारा म्हसोबा अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र म्हस्वेश्र्वर खारावडे महाराजांच्या वज्रलेपविधी पुर्ण झाला असून विधिवत रासायनिक प्रक्रिया करून विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर मंदिराच्या गर्भगृहाचा मुख्य दरवाजा भविकांसाठी उघडण्यात आला. बुधवार 27 मार्च रोजी मंदिराच्या गर्भगृहात सकाळी ११ ते ४ धार्मिकविधी पार पडल्यानंतर पुन्हा मंदिर भविकांसाठी खुले करण्यात आले आहे. 

नवसाला पावणारा श्री म्हसोबा म्हणुन हे देवस्थानं प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशा श्रीक्षेत्र म्हस्वेश्र्वर देवस्थानाची जिर्णोद्धाराचे काम सुरू असताना संस्थेच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आणि ऐतिहासिक संदर्भ पाहता पहिला वज्रलेप विधी १२ मार्च पासून सुरवात करण्यात आला होता. मंदिर परिसरामध्ये गेले सहा महिन्यापासून विविध प्रकारचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असतानाच म्हसोबा महाराजांच्या मूळरूपाचेही दर्शन भाविकांना व्हावे यासाठी सदस्यांच्या आग्रहाखातर विधिवत या वज्रलेपाची प्रक्रिया उत्तमरीत्या पार पडली असून सुमारे 300 ते 400 वर्षापासून शेंदूर लेप या मूर्तीवरती चढवले जात असल्यामुळे मंदिराचा जिर्णोद्धार सुरू असताना मूर्तींचे मूळरूप प्राप्त व्हावे या भावनेने श्री क्षेत्र म्हसोबा देवस्थानचे अध्यक्षा मधुराताई भेलके यांनी सांगितले.

अधिक वाचा  शरद पवार पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित ; गॅस सिलेंडर 500 रुपयांना देणार तर कंत्राटी भरती बंद… जाणून घ्या थोडक्यात