विक्रांत मेस्सी स्टारर 12वी फेल हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित याचित्रपटाला समीक्षकांसोबतच प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला होता.

विधू विनोद चोप्रा आणि विक्रांत मेस्सी अभिनीत या चित्रपटाने केवळ भारतातच नाही, तर जगभरातही चांगली कमाई केली.

या चित्रपटात विक्रांत मेस्सीने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलली. आता या चित्रपटाने आणखी एक कमाल केलीआहे.

विक्रांत स्टारर 12 वी फेल हा चित्रपट 96 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठवण्यात आला आहे. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठीस्वतंत्र नामांकन देण्यात आले आहे.

अधिक वाचा  काहीही करा फक्त गर्दी जमवा! सभेला चला, सभेला चला शहरात फलक sms अन् फोन तरी नेत्यांची होतेय दमछाक

अभिनेता विक्रांतने साहित्य आज तक 2023 मध्ये चाहत्यांना ही माहिती दिली.

12वी फेलची कथा अनुराग ठाकूर यांनी लिहिलेल्या पुस्तकातून घेतली आहे. ज्यामध्ये IPS अधिकारी मनोज कुमार यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे.

चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर चंबळमधील एका तरुणाने बारावीत नापास होऊनही आयपीएस अधिकारी बनण्याचे त्याचेस्वप्न कसे पुर्ण केले ही प्रेरणादायी कहानी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

या चित्रपटात अनंत जोशी, अंशुमन पुष्कर, मेधा शंकर आणि गीता अग्रवाल यांनीही महत्वाच्या भुमिका साकारल्या आहेत.

यंदा अनेक भारतीय स्वतंत्र चित्रपट ऑस्करला गेले आहेत. यामध्ये आर माधवनचारॉकेटरी: नंबी इफेक्ट‘, एसएस राजामौलीचाआरआरआरआणि विवेक अग्निहोत्रीचा काश्मीर फाइल्सयांचा समावेश आहे. संजय दत्तचालगे रहो मुन्नाभाईआणि भगनानीचायंगिस्तानया चित्रपटांनी देखील स्वतंत्र चित्रपट यादीत ऑस्करमध्ये एंट्री केली होती.