मुंबई : राष्ट्रीय समाज पक्ष आता भाजप प्रणित एनडीएतून बाहेर पडला असून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे, पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी माध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. त्यामुळं एनडीएतून आणखी एक पक्ष वगळला गेल्यानं राज्यात एनडीएची ताकद कमी होऊ शकते.

जानकरांनी काय म्हटलं?
महादेव जानकर म्हणाले, “आत्ता सध्याला आम्ही स्वबळाचा नारा देत आहोत. ५४३ लोकसभेच्या जागांसाठी आम्ही तयारी करतो आहोत, सर्वच ठिकाणी आम्हाला उमदेवार मिळतील असंही नाही. पण आम्ही ‘एनडीए’सोबतही नाही आणि ‘इंडिया’सोबतही नाही. लोकांना आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणं आणि राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांची तयारी करा हेच मी आज कार्यकर्त्यांना सांगतो आहे.
…….
‘इंडिया’च्या बैठकीआधीच राऊतांचं मोठं विधान एवढ्या जागा लढणारच? काँग्रेसची अशी भूमिका

अधिक वाचा  LIVE मॅचमध्ये राडा; हार्दिक पांड्याच नाव घेताच चाहत्याला लाथा-बुक्क्यानी मारहाण

विरोधकांच्या इंडिया आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी जागावाटपाचा मुद्दा वादाचा ठरणार असल्याचं बोललं जातंय. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे किती खासदार राहतील? यावर संजय राऊतांनी थेट भाष्य केलंय. त्यामुळे महाविकास आघाडीत नव्या संघर्षाला सुरूवात झालीय.
खासदार संजय राऊतांनी इंडियाच्या बैठकीच्या आधीच राजकीय तोफ डागलीय. इंडियाची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत बैठक होतेय. पण त्या आधीच संजय राऊतांनी आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा आकडा जाहीर केलाय.

महाराष्ट्रातून शिवसेनेचे 18 खासदार होते तो आकडा लोकसभेमध्ये कायम राहील आणि दादरा नगर हवेलीचा एक असे 19 खासदार राहतील. 19 चे 20 होतील पण 19 चे 15 होणार नाहीत, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.
19 जागांचा आकडा कायम राहणार असल्याचं संजय राऊतांनी जाहीर केल्यानं महाविकास आघाडीत घमासान झालं नसतं तरच नवल. कारण महाविकास आघाडीत अजून जागावाटपाच्या चर्चेला सुरूवातच झालेली नाही. त्यामुळे संजय राऊतांनी आधीच आकडा जाहीर केल्यानं घटक पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

अधिक वाचा  … आता एआय करणार सगळं काम! पुण्यातील तरुणांनी उभारलं ‘अमेझॉन-गो’ स्टाईलचं 24×7 ग्रोसरी स्टोअर

‘आढावा घेत असतानाही उद्धव ठाकरेंनी मेरिट असेल त्याच्या आधारावर जागावाटपाचं धोरण स्वीकारू असं सांगितलं. मेरिटच्या आधारावर निर्णय होणार आहे, त्यामुळे आम्हाला 25 मिळतील का त्यांना 18 मिळतील हा प्रश्न नाही,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

मेरिटवर जागावाटप करावं अशी भूमिका काँग्रेसनं घेतलीय. तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या 18 जागा आणि नंतर पोटनिवडणुकीत जिंकलेली एक जागा अशा 19 जागांवर तडजोड होणार नसल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता महाविकास आघाडीत जागावाटप कसं होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.