शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या विविध योजना गावपातळीपर्यंत पोहोचविण्यासाठी 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान कृषी योजनाविषयक माहिती मेळाव्याचे राज्यव्यापी अभियान सुरू आहे.

हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी राज्य शासन साजरी करते. त्यानिमित्ताने कृषी विभागाच्या योजना गावशिवारापर्यंत पोहोचविण्यासाठी उपक्रम राबविला जात आहे, त्याचाच भाग म्हणून मुळशी तालुक्यातील घोटावडे व परिसरातील शेतकरी बांधवांसाठी कृषी योजनाविषयक माहिती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी मुळशी श्री हनुमंत खाडे साहेब, कृषी अधिकारी श्री एन बी झंजे साहेब, श्री गंगाराम मातेरे, तात्या देवकर, प्रकाश भेगडे, सरपंच सौ सारिका खानेकर, राजेंद्र मारणे, कृषि पर्यवेक्षक विकास भोर व आर एन सुपेकर साहेब, कृषी सहाय्यक व्ही एन काळभोर, ए बी काळे, गणेश तांदळे, अमोल गायकवाड, नवनाथ देवकर, मनीषा शिरसाट, व आत्मा चे विलास गवळी व परिसरातील शेतकरी बांधव तसेच महीला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  मतदारांच्या नावाने बोगस व्यक्तीकडून मतदान, शिरुरमध्ये धक्कादायक प्रकार

यावेळी कृषी पर्यवेक्षक श्री विकास भोर यांनी महाडीबीटी वरील विविध योजनांची माहिती दिली. त्यानंतर कृषी सहाय्यक गणेश तांदळे यांनी पी एम किसान योजना तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सामुग्री योजना विषयी माहिती दिली. त्यानंतर कृषी सहाय्यक श्रीमती मनीषा शिरसाट यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व कीड रोग नियंत्रण याविषयी माहिती दिली तसेच सेंद्रिय शेतीचे महत्व विशद केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांसोबत चर्चासत्र आयोजित केले होते त्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध शंका कुशंकांचे निरसन करण्यात आले. सरते शेवटीतालुका कृषी अधिकारी श्री हनुमंत खाडे साहेब यांनी कृषी विभागाच्या सर्व योजना ऑनलाइन झालेल्या आहेत. ऑफलाइन अर्ज प्रक्रिया बंद केली आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज कसा भरावा, त्यासाठी कोणती कागदपत्रे हाताशी ठेवावीत, या विषयीची माहिती दिली. त्याचबरोबर मनरेगातून फळबाग लागवड, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, शेततळे व त्यासाठी अस्तरीकरण, पी एम किसान योजना, ठिबक सिंचन तसेच कृषी यांत्रिकीकरण यासाठी असलेल्या योजनांची सविस्तर माहिती दिली. सोबतच शेतकऱ्यांना आपला दृष्टिकोन बदलण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी परिसरातील 150 शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी आभार श्री राजाराम शेळके यांनी मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.साहेबराव बेगडे यांनी केले.