amit sadh
चित्रपट, वेब शो मधून नेहमीच अनोख्या भूमिका साकारून अभिनेता अमित साध ने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. भूमिका कुठलीही असो अमित नेहमीच आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात राहिला. त्याच्या प्रत्येक पात्रांमध्ये एक विशिष्ट करिष्मा आणि आकर्षण आहे जे नेहमीच प्रेक्षकांना भावल. अमितच्या कलाकारी प्रवासातली त्याचा बेस्ट पाच भूमिका बद्दल जाणून घेऊ या !
ब्रीद: इनटू द शॅडोज– ब्रीदचा दुसरा भाग आला आणि अमितच्या भूमिकेने पुन्हा एकदा तो चर्चेत आला. या वेब शो मधल  ” कबीर सावंत ” हे त्याचं पात्र चांगलं गाजलं. मोठ्या आव्हानांना सामोर जात प्रतिभाशाली अभिनेता अभिषेक बच्चन त्याच्यासोबत त्याने यात  स्क्रीन स्पेस शेअर केली.
काई पो चे ! – 2013 मध्ये आलेला कल्ट  सिनेमाने  अमित साध यांना केवळ प्रसिद्धीच्या झोतात आणले नाही तर ओंकार शास्त्री हे अनोखं पात्र या चित्रपटातून बघायला मिळालं. मैत्री आणि राजकारण यांच्यात अडकलेल्या तरुणाची ही एक गोष्ट होती. अमितने ओमीच्या व्यक्तिरेखेत अत्यंत कमालीचं काम केलं त्याचा  भोळापणा आणला ज्याने तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला.
ब्रीद- ही सर्वोत्कृष्ट भारतीय थ्रिलर्सपैकी एक उत्तम वेब मालिका आहे आणि दुसरी भारतीय Amazon प्राइम मालिका देखील आहे. या क्राईम ड्रामा थ्रिलरमध्ये अमितने सीनियर इन्स्पेक्टर कबीर सावंत यांची भूमिका साकारली आहे. डेन्झेल विरुद्ध “डॅनी, सुपर टॅलेंटेड आर. माधवनने भूमिका केली आहे.
अव्रोध: द सीज विदिन- अमित साधने पॅरा एसएफचा टीम लीडर मेजर विदीप सिंगची भूमिका केली आहे. ही अमितच्या आव्हानात्मक भूमिकांपैकी एक भूमिका आहे. या भूमिकेसाठी त्याने विशेष कष्ट आणि प्रशिक्षण घेऊन अमितने हे पात्र साकारले.
जीत की झिद- अमित साध प्रत्येक रोल मध्ये फक्त त्याचा दिसण्या ने नाही तर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकतो. अमितने मेजर दीप सिंग या स्पेशल फोर्स ऑफिसर ची भूमिका साकारली. जो कारगिल युद्धात कंबरेपासून अर्धांगवायू झाला होता, परंतु त्याच्या दृढनिश्चयामुळे तो पूर्णपणे बरा झाला. तो त्याचे पात्र धैर्याने आणि दृढनिश्चयाने चित्रित करतो. त्याच्या कामगिरीबद्दल त्याचे चाहते त्याचे कौतुक नेहमीच करतात.
अमित साधने अनेक उत्तम आणि सशक्त पात्र साकारली आणि नेहमीच या भूमिकांना न्याय दिला. अद्भूत, शक्तिशाली कथांसह त्याने नेहमीच सगळ्यांचं मनोरंजन केल.
अधिक वाचा  पोटावरून २७६ किलोंच्‍या १२१ दुचाकी… पंडित धायगुडेंनी दुसऱ्यांदा रचले ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’