राजस्थानमधील जैसलमेर येथे जिल्हा कलेक्टर टीना डाबी यांच्या आदेशानंतर यूआयटी सहायक अभियंत्याच्या नेतृत्वात पाकिस्तानातून आलेल्या विस्थापित हिंदूंच्या घरांवर बुलडोझर चालवण्यात आले आहे. या प्रकारानंतर आएएस टीना डाबी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. डाबी यांच्या आदेशानंतर जैसलमेर येथे घरे पाडण्यात आली. यामुळे लहान लेकरांसह तब्बल १५० लोक बेघर झाले आहेत. कडाक्याच्या उन्हाळ्यात त्यांना उघड्यावर राहावे लागणार आहे.

याआधी काही दिवसांपूर्वी जोधपुर येथे देखील पाकिस्तानतील अत्याचारामुळे विस्थापित होऊन भारतात आलेल्या हिंदूच्या घरावर देखील असेच बुलडोझर चालवण्यात आले होते. जैसलमेर येथे नगर विकास न्यास यांच्याकडून सागर पंचायतच्या जमीनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मंगळवारी कारवाई करण्यात आली. जैसलमेर येथे अमर सागर भागात राहाणाऱ्या पाकिस्तानातून आलेल्या हिंदुची घरे कलेक्टर टीना डाबी यांच्या आदेशानंतर पाडण्यात आली.

अधिक वाचा  बीसीसीआयचा केंद्रीय करार जाहीर! खेळाडू मालामाल! ही नावं वगळली या नव्या चेहऱ्यांचा समावेश संपूर्ण यादी

प्रशासनाने सांगितलं की ही विस्थापित कुटुंबे अमर सागर तलावाच्या किनाऱ्यावर अवैध घरे उभारून राहत होती. त्यामुळे तलावात येणारे पाणी आडवले जात होते. तसेच ही जमीनीची किंमत देखील खूप जास्त असल्याचे सांगितले जाते. दरम्यान या कारवाईमध्ये जेसीबी, ट्रॅक्टर आणि पोलीसांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.हे अतिक्रमण काढताना लोकांनी विरोध देखील केला.

मिळालेल्या माहितीनुसार अमर सागर सरपंचांनी जिल्हा कलेक्टर आणि यूआयटी यांच्याकडे याबद्दल अनेकवेळा तक्रार दिली होती. यूआइटीने कोट्यवधी रुपये किंमतीची जमीन मोखळी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे मदत मागितली होती. त्यानंतर विस्थापितांना जागा सोडण्याबाबत आदेश जारी करण्यात आले होते.

अधिक वाचा  ब्लुमबर्गचे पहिले भारतीय सल्लागार ठरले सुरेश प्रभू

टीना डाबी ट्वीटरवर ट्रेंड

या कारवाईनंतर ट्विटरवर टीना डाबी ट्रेंड करत होते. २०१५ साली आएएस टॉपर राहिलेल्या टीना डावी सध्या जैसलमेर येथे कलेक्टर आहेत. त्यांच्या आदेशानंतर जैसलमेर येथे पाकिस्तानातून आलेल्या हिंदुंची घरे प्रशासनाने पाडली.