मुंबई: द केरळ स्टोरी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दिवसागणिक त्यावरून वाद चालला आहे. या सिनेमाला काहींनी विरोध केला आहे तर काहींनी त्याला पाठिंबा दिला आहे. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई करत आहे. काहींच्या मते हा सिनेमा म्हणजे एक अजेंडा आहे. तर काहींनी या सिनेमात जे दाखवलं जात आहे ते खोटं असल्याचं सांगत सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील राज्य सरकारनं कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत या सिनेमावर बंदी घातली आहे. सिनेमाबाबत घेतलेल्या या निर्णयामुळे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसंच सिनेमावर अन्याय होऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडली आहे.

अधिक वाचा  हे तीर्थस्थानी फेअरवेल तर मोक्ष मिळतो; राजकारणातून संपलेला अध्याय संजय राऊतांची मोदींवर खोचक टीका

सिनेमावर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये बंदी घातल्याबाबत निर्माते विपुल शाह यांना विचारलं. त्यावर ते म्हणाले की,’तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील राज्य सरकारांनी जर असा निर्णय घेतला तर आम्ही कायदेशीर कारवाई करू. कायद्याच्या तरतुदीनुसार जे शक्य असेल ते आम्ही करू.

एका व्यक्तीमुळे सिनेमा थांबवला

द केरळ स्टोरी सिनेमाला जो प्रतिसाद मिळत आहे, तो पाहून विपुल शाह यांनी आनंद व्यक्त केला आहे. तमिळनाडूमध्ये सिनेमावर बंदी घालण्याबाबत शाह म्हणाले की, ‘एका व्यक्तीमुळे हा सिनेमा प्रदर्शित होणं थांबलं आहे. ही गोष्ट चुकीची आहे. कोर्टानं सिनमाला परवानगी दिल्यानंतर ते थांबवणारे कोण आहेत? आम्ही कायदेशीर मार्गानं लढा देऊ. देशातील एक गंभीर समस्या आम्ही सिनेमातून मांडली आहे.’

अधिक वाचा  पुण्यात भाजपची रात्री उशीरापर्यंत बैठक, काय घडतंय? प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

हायकोर्टात जाऊन लढू

विपुल यांनी पुढं सांगितलं की, ‘ देशातील नगारिकांनी या सिनेमाला चांगला प्रतिसाद दिल्या त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. सिनेमाचा विषय महत्त्वाचा असून तो जास्तीत जास्त लोकापर्यंत जायला हवा. पंतप्रधानांनी देखील या सिनेमावर भाष्य केलं आहे. काहींनी या सिनेमाला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी याला विरोध केला आहे. राष्ट्रीय पातळीवर या सिनेमाकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. ही गोष्ट आमच्यासाठी नक्कीच अभिमानाची आहे. तामिळनाडूमध्ये केवळ एका व्यक्तीमुळे सिनेमाचं प्रदर्शन थांबवलं गेलं आहे. त्यामुळे तमिळनाडूमधील सरकारला मी निवेदन करतो की याविरोधात कठोर कारवाई करा आणि सिनेमाच्या प्रदर्शनातील अडसर दूर करा.’

अधिक वाचा  बारामतीत आमदारकीची ‘साखर पेरणी’ सुरू झाली का?; लोकआग्रहास्तव जनता दरबार अन् पुतण्याने ‘दंड’ थोपटले

तामिळनाडूत सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी

तामिळनाडू पहिल्यांदा या सिनेमावर बंदी घालण्यात आली. ही बंदी तामिळनाडूच्या सरकारनं नाही नव्हे तर थिएटर्स असोसिएशननंच हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत थिएटर्स अँड मल्टिप्लेक्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एम. सुब्रमण्यम यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, काही मल्टिप्लेक्सनं सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमात प्रसिद्ध स्टार कोणीही नसल्यानं सुरुवातीला तो प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता.