देशातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय कृषी खात्याने एक नवे पाऊल उचलले आहे. बनावट बियाणांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन मोबाईल अॅप जारी केले आहे. देशातील सर्व 14 कोटी शेतकऱ्यांना या अॅपचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
दरम्यान जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधीच्या 14व्या हप्त्याचीही वाट पाहत असाल तर त्याचे पैसे मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जारी केले जाऊ शकतात.
पोर्टल आणि मोबाईल अॅप जारी केले
केंद्रीय कृषिमंत्र्यांनी बनावट बियाणांच्या प्रमाणीकरणासाठी पोर्टल आणि मोबाईल अॅप जारी केले. एका निवेदनानुसार, तोमर यांनी ‘साथी’ (SATHI अॅप) (सीड ट्रेसेबिलिटी, ऑथेंटिकेशन आणि होलिस्टिक इन्व्हेंटरी) नावाचे पोर्टल आणि मोबाइल अॅप लॉन्च केले. हे अॅप बियानांच्या गुणवत्तेचा मागोवा घेणे, प्रमाणीकरण आणि साठवणुकीसाठी केंद्रीकृत ऑनलाइन प्रणाली आहे.
एनआयसीने कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने केले
बियाणे उत्पादन, दर्जेदार बियाणे ओळखणे आणि बियाणे प्रमाणीकरण या आव्हानांना तोंड देण्यासाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे. एनआयसीने ‘सर्वोत्तम बियाणे-समृद्ध शेतकरी’ या थीमवर कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने विकसित केले आहे. यावेळी तोमर म्हणाले की, विविध योजना आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने आणि अडचणींवर मात करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.