Garment Traders congress

मुंबई, दि. २० एप्रिल-
देशातील गारमेंट उत्पादक व वितरक यांची एक हजार कोटी रुपयांची थकबाकी फ्युचर ग्रुपचे अध्यक्ष किशोर बियानी यांनी दिलेली नाही. जवळपास ३०० उत्पादक व वितरक यांची ही थकबाकी असून लेखी आश्वासन देऊनही बियानी यांनी ही थकबाकी दिलेली नसल्याने हे व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत.किशोर बियानी यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेत तक्रारही दाखल करण्यात आली आहे अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य कार्यालय टिळक भवन येथे गारमेंट उत्पादक व वितरकांची बैठक झाली. या बैठकीला प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, सुरेशचंद्र राजहंस, गारमेंट उत्पादक व वितरक संघटनेचे पदाधिकारी, विश्वास उटगी, पंकज वीरा, रमन मिश्रा, ऍड निरंजनी शेट्टी, अविरल मिश्रा यांच्यासह सुरत, नांदेड, तिरूपुर, भिवंडी व मुंबईतील उत्पादक व वितरक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  हनुमानाचा जन्म पहाटेचा; देवदर्शनाला जाताना ‘या’ तीन गोष्टी आठवणीने घेऊन जा!

किशोर बियानी यांनी वितरकांचे एक हजार कोटी रूपये त्वरित न दिल्यास त्यांच्या एकूण व्यवसायाविरूध्द जनमत संघटीत करणे व IBC कायद्यात सध्या नसलेल्या संरक्षणामुळे बड्या कार्पोरेट उद्योगपतींवर कारवाई कशी करता येईल याकरिता सर्व राज्य व केन्द्र सरकारकडे साकडे घालणे ही कृति हाती घ्यावी अशी चर्चा यावेळी करण्यात आली.