राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या वतीने ‘द पूना स्कुल ऑफ ब्लाइंड गर्ल्स’ (कोथरूड) च्या १२० अंध विद्यार्थिनींना उपयोगी साहित्याचे वाटप ,भोजन कार्यक्रम, अन्नदानचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष मा.प्रशांत दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष मा प्रशांत दादा जगताप यांनी शाळेतील अंध विध्यार्थींसमवेत केक कापून वाढदिवस साजरा केला.

प्रशांत दादा जगताप यावेळी बोलताना म्हणाले, ‘या उपक्रमाच्या माध्यमातून वेगळाच आनंद आणि समाधान मिळाले. जेवणाचा आनंद घेताना अंध विद्यर्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देणारा होता’.तसेच माझ्या वाढदिवसाचा हा अतिशय अविस्मरणीय क्षण म्हणून माझ्या नेहमी स्मरणात राहील

अधिक वाचा  सध्याच्या परिस्थितीत आनंदराज आंबेडकरच समाजाला दिशा देऊ शकतात – उत्तमराव खोब्रागडे

‘समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमातून मदत करणे हा हेतू या उपक्रमाचा होता’ असे ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरुनानी म्हणाले.

या वेळी मा.सनी मानकर,मा.किशोर कांबळे,मा.अजिंक्य पालकर,मा.मिलिंद वालवडकर, मा श्रीकांत बालघरे, मा.मोहित बराटे, मा. अमोल गायकवाड , मा.स्वप्नील खवले , मा.हृषिकेश शिंदे, मा.तेजस बनकर , मा.किशोर भगत मा.सूरज कालेकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते..