सामान्य पुणेकरांच्या मागणीचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी विरोधी पक्षनेते दिपालीताई धुमाळ यांनी पुणे महापालिकेच्या मालमत्ता करामध्ये पूर्ववत सुरू असलेली 40 टक्के सवलत राज्य शासनाने मान्य केली आहे. सामान्य पुणेकर व्यावसायिक यांच्या कायमच हिताची बांधील असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागणीला राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीमध्ये मान्यता मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या मागणीला हे मोठे यश आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पुणेकरांना मिळकत करात 40 टक्के सवलत देणार व तीनपट टॅक्स आकारणी एकपट करणार असे जाहीर केले होते. परंतु मंत्री मंडळाने निर्णय घेताना 40 टक्के सवलतीबाबत निर्णय घेण्यात आला असून ३पट टॅक्स आकारणी बाबत निर्णय झालेला नाही.
निर्णयाची 01 एप्रिल पासून अंमलबजावणी केली जाणार असून 31 मार्च, 2023 पर्यंतच्या फरकाच्या रकमेची वसुली माफ करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. माञ समाविष्ट गावातील व्यवसायिक, छोटे दुकानदार यांना तीनपट टॅक्स आकारणी केली असून ती अन्यायकारक आहे. यावर विधानसभेत चर्चा देखील झाली असताना पुणे शहरातील समाविष्ट भागांमधील छोट्या व्यवसायधारकांवर अन्याय होत आहे.
राज्य शासनाने सर्वसामान्य पुणेकरांच्या मागणीचा विचार करत घेतलेला निर्णय स्वागतहार्य असला तरीही सर्वसामान्य पुणेकरांबरोबरच पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या सुमारे 33 गावातील नागरिकांच्या यातनाही शासनाच्या वतीने दखल घेण्याची गरज होती. राज्य शासनाच्या वतीने हेतूतहा समाविष्ट गावातील असंतोष वाढवण्याचे काम केले जात असून यावर त्वरित निर्णय न झाल्यास खूप मोठी असंतोषाची लाट निर्माण होण्याची भीती आहे. राज्य शासनाच्या वतीने समाविष्ट गावांच्या विकासासाठी शाश्वत काम करण्याची गरज असताना हेतूतहा या भागातील असंतोषाला हवा देत पुणे शहराचा नियोजित विकास करण्याचा छुपा डाव असून या माध्यमातून पुणे शहराचा जो शाश्वत विकास सुरू आहे त्याला अडथळा आणण्याचे काम केले जात आहे. समाविष्ट भागातील तीन पट्ट्या रद्द न झाल्यास उंड्री आणि फुरसुंगी या दोन ग्रामपंचायतीप्रमाणे पुणे शहराच्या विविध लोकांवर असलेल्या नवीन समाविष्ट गावात सुद्धा स्वतंत्र नगरपालिकेची मागणी जोर धरली जात आहे. तत्कालीन युती सरकारला पुणे शहराच्या विकासामध्ये बाधा आणण्याची इच्छा आहे असा आरोपही विरोधी पक्षनेत्या दिपालीताई धुमाळ यांनी केला आहे. तीनपट टॅक्स बाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपालीताई धुमाळ यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.