भारतापासून दक्षिण चीन आणि थायलंडपर्यंत या वर्षाच्या सुरुवातीला असामान्य उष्णतेची लाट आली आहे. भारतात प्रयागराजचे तापमान सोमवारी 44.6 अंश सेल्सिअस (112.3 डिग्री फॉरेनहाइट) वर पोहोचलं. बांगलादेशातही 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे, असं अहवालात म्हटलं आहे. हवामान तज्ज्ञ आणि हवामान इतिहासकार मॅक्सिमिलियानो हेरेरा यांनी इशारा दिला आहे की “हवामान आणखी वाईट होईल. द गार्जियनने मॅक्सिमिलियानो हेरेराचा हवाला देत या असामान्य उच्च तापमानाचं वर्णन “एप्रिलच्या इतिहासातील सर्वात वाईट उष्णतेची लाट” असं केलं आहे. उत्तर आणि पूर्व भारतातील सहा शहरांमध्ये मंगळवारी 44 सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली, तर राजधानी दिल्लीत मंगळवारी 40.4 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उष्णतेची लाट किमान शुक्रवारपर्यंत कायम राहण्याची अपेक्षा असल्याचे गार्डियनने वृत्त दिलं आहे.
हवामान संकटाच्या बाबतीत बांगलादेशची राजधानी ढाका सर्वात पुढे आहे, जिथे तापमान 40 सेल्सिअसपेक्षा जास्त वाढलं आहे. शनिवारी येथील तापमान 58 वर्षांतील सर्वात उष्ण होतं, त्यामुळे रस्त्याचा पृष्ठभागही वितळला. अहवालात म्हटलं आहे, की पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं, की जर उष्णता कमी झाली नाही तर ते काही भागात तापमान आणीबाणी घोषित करतील.
CNN ने थायलंडच्या हवामानाविषयीच्या थाई हवामान विभागाच्या डेटावर आधारित असं म्हटलं आहे की, आठवड्याच्या शेवटी थायलंडने इतिहासात प्रथमच 45 °C (113 °F) तापमान गाठलं. वायव्येकडील टाक शहरातील तापमान शनिवारी 45.4 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. परंतु देशाच्या मोठ्या भागांमध्ये मार्चच्या उत्तरार्धापासून 30 अंश ते 40 अंश सेल्सिअस तापमान राहिलं.
सीएनएन की रिपोर्ट के मुताबिक थाईलैंड के प्रधान मंत्री प्रयुत चान-ओ-चा ने मंगलवार को, “थाईलैंड के विभिन्न हिस्सों में खतरनाक उच्च तापमान” पर चिंता जाहिर की और कहा कि बैंकॉक के बंग ना क्षेत्र में तापमान “52.3 डिग्री सेल्सियस तक पहुंच सकता है.” हेरेरा ने ट्वीट किया, पड़ोसी म्यांमार ने सोमवार को मध्य सागैंग क्षेत्र के कलेवा में अप्रैल तापमान ने रिकॉर्ड बनाया, जो 44 डिग्री सेल्सियस (111 डिग्री फारेनहाइट) तक पहुंच गया.
थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान-ओ-चा यांनी मंगळवारी “थायलंडच्या विविध भागात धोकादायक उच्च तापमानाबद्दल” चिंता व्यक्त केली. बँकॉकच्या बंग ना भागात तापमान “52.3 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतं,” असे सीएनएनने वृत्त दिलं आहे. शेजारच्या म्यानमारने सोमवारी मध्य सागाइंग प्रदेशातील कालेवा येथे एप्रिलचे विक्रमी तापमान 44 अंश सेल्सिअस गाठले, असं हेरेरा यांनी ट्विट केलं.