राघव चड्ढा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर परिणीती चोप्रा म्हणाली, ‘माध्यमांमध्ये सध्या माझ्याबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत. पण कधी-कधी खासगी आयुष्यावर रंगणाऱ्या चर्चांबाबत जेव्हा सर्व मर्यादा ओलांडल्या जातात, तेव्हा त्यामध्ये एक रेखा तयार होते.
याला तुम्ही अपमान समजू शकता! चर्चा करणं आणि आपमान करणं यामध्ये एक लहान रेखा आहे…’
पुढे अभिनेत्री म्हणाले, ‘एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण मला द्यायचं नसेल तर मी देणार नाही…’ असं अभिनेत्री म्हणाली, पण यावेळी अभिनेत्रीने खासदार राघव चड्ढा यांचं नाव घेतलं नाही.. दरम्यान, परिणीती आणि राघव चड्ढा यांची लग्नाची तयारी देखील सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे खासदार संजीव आरोरा यांनी ट्विट करत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर चर्चांनी अधिक जोर धरला.
मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती – राघव यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झालं असलं तरी, दोघांच्या प्रेमाची सुरुवात मात्र नुकताच झाली आहे. दोघे पंजाब येथे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरलं. परिणीती तेव्हा पंजाब येथे सिनेमाचं शुटिंग करत होती. तेव्हाच दोघांची भेट झाली आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झालं असं सांगण्यात येत आहे.
परिणीती सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. शिवाय सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्यामुळे परिणीती खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत असलेल्या नात्याचा खुलासा कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.