पुणे : अजितदादा मंत्रालयात असून माझ्या बिचाऱ्या दादाचे असे झाले आहे की काहीही झाले तरी माझ्या भावावर त्याचे खापर फोडले जाते. पण मार्केटमध्ये जे नाणे चालते, त्याची जास्त चर्चा सुरु असते.त्यामुळे मला एक गोष्ट आठवते, भूकंप झाला तर तो पवारसाहेबांनी केला. पण त्या भूकंपामध्ये बिचाऱ्या पवारसाहेबांची काय चूक आहे, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली. खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील वेताळ टेकडी प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलत होत्या.

राष्ट्रवादीचे अनेक आमदार नॉट रिचेबल असून 40 आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, 40 आमदार कोणत्या बाबतीत नाराज आहेत. तुमचे लग्न झाले आहे का, असा प्रश्न समोरच्या पत्रकाराला विचारला. मी नाते का लावते तर बायको नाराज झाल्यावर सोडून जाते की, रुसून बसते. त्यामुळे तुमच्या म्हणण्याला जर तथ्य असेल तर मी नक्कीच नाराज असलेल्या आमदारांसोबत चर्चा करेन, असे सुळे यांनी सांगितले.

अधिक वाचा  हे मी माझ्या स्वत:च्या अनुभवातून सांगतोय, मागच्या पाच वर्षात रुटीन बदललं अन्… अमित शाहांनी सांगितला फिटनेस मंत्रा

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, मी सर्व खासदार व आमदार यांच्या संपर्कात असते. तसेच पवारसाहेब, अजितदादा आणि जयंत पाटील हे देखील 24 तास सर्वांच्या संपर्कात असतात. त्यामुळे जर एखादा कोणी नाराज असेल, तर ते आमच्या कानावर निश्चित आले असते. त्यामुळे एकूणच आमच्या कोणाच्याही मनात शंका नसून टीव्हीवर ती जास्त वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान उष्माघातामुळे 13 नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेला महाराष्ट्र सरकारच  जबाबदार आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. तुम्ही कुटुंबातील व्यक्तीची किंमत पैशात मोजू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  ‘पहलगाम’चा वार जिव्हारी; PM मोदींनी ‘सौदी’चा दौरा आटोपला; मोठा निर्णय? सुरक्षा समितीची बैठक बोलावली