तृणमूल काँग्रेसकडून पराभव स्वीकाराव्या लागलेल्या भाजपसाठी आता एक चांगली बातमी आली आहे. निवडणूक झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले वरिष्ठ नेते मुकल रॉय पुन्हा भाजपात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी म्हटले आहे की मी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहे. इतकेच नाही तर त्यांनी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेटीसाठी वेळही मागितली आहे. रॉय यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीचे ते आमदार आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याची इच्छा आहे. कारण ते पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. रॉय यांनी याआधीही अनेक वेळा पक्ष बदलला आहे. निवडणुकीच्या आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांनी पुन्हा स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षेइतक्या जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे भाजपमधील अनेक आमदारांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पश्चिम बंगाल मध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे. असे असताना रॉय पुन्हा भाजपमध्ये परतत असतील तर ही भाजपसाठी गुड न्यूजच म्हणावी लागेल.
बंगालात BJP साठी गुडन्यूज; तृणमूलचा ‘हा’ बडा नेता फुटण्याच्या तयारीत मुंबईचा दणका ! सचिनच्या पोराने केली ‘ही’ कमाल.. वर आलीय ‘ती’ वेळ; पहा कुठे चालली आहे कंपनीची वाटचाल आणि म्हणून निळू फुले यांनी नाकारला पुरस्कार; पहा काय दिले होते तत्कालीन सरकारला कारण रशियाच टार्गेट ! G 7 देशांच्या बैठकीत घेतला ‘हा’ मोठा निर्णय तृणमूल काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांबरोबर झालेल्या मतभेदनंतर 2017 मध्ये मुकुल रॉय यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष केले होते. रॉय यांनी भाजपच्या तिकिटावर 2021 मध्ये विधानसभा निवडणूक लढली होती मात्र परिणाम घोषित झाल्यानंतर एक महिन्यानंतर त्यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता.
प्रसारमाध्यमांशी बोलताना रॉय म्हणाले, मी भाजप आमदार आहे. मी भाजपबरोबरच राहणे महत्वाचे वाटते. मी गृहमंत्री अमित शहा यांना भेटू इच्छितो. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशीही चर्चा करायची आहे. ते पुढे म्हणाले, काही काळासाठी मी अस्वस्थ होतो त्यामुळे राजकारणापासून दूर होतो. पण आता मी ठीक आहे आणि पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहे. आता भविष्यात पुन्हा कधीही तृणमूल काँग्रेसचा विचार करणार नाही. या पक्षाबरोबर कोणतेही संबंध ठेवणार नाही.
या घडामोडींनंतर पश्चिम बंगाल भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, की भाजपला आता मुकुल रॉय यांच्याबाबत विशेष काही वाटत नाही. तर सुकांत मजूमदार यांनी म्हटले की मुकुल रॉय यांनी त्यांच्या राजनीतिक विचारधारेमुळे भाजप सोडला होता. त्यांनी दिल्लीला जाण्याआधी माझ्याशी कोणतीही चर्चा केली नाही.