मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. मराठा क्रांती ठोक मोर्चातील काही लोक नाराज असल्यानं त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात नारेबाजी देखील करण्यात आली. चंद्रकांत पाटील हे केवळ समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उप समितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करा अशी मागणी सर्व समन्वयकांनी केली. त्यामुळं गोंधळ निर्माण झाला.
समाजात फूट पाडण्याचा चंद्रकांत पाटलांकडून प्रयत्न
मंगळवारी (18 एप्रिल) मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीला अध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. बैठकीमध्ये मराठा समाजाच्या समन्वयकांनी चंद्रकांत पाटील यांना अनेक प्रश्न केले. मात्र, त्यांनी त्याची उत्तरे देता आली नसल्याचे मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य समन्वयक अंकुश कदम म्हणाले. चंद्रकांत पाटील मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही कदम यांनी यावेळी केली. त्यामुळं चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उप समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळेच समितीच्या बैठकीमध्ये गोंधळाचा वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.