आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपचं ऑपरेशन लोटस सुरु झालं आहे, असं बोललं जातं आहे. राज्यात सुरु असलेल्या अजित पवार यांच्याबाबतच्या उलटसुलट राजकीय चर्चा हा ऑपरेशन लोटसचाच भाग असल्याचीही शंका घेतली जाते. त्यात एक महत्त्वाचा भाग म्हणजे, ऑपरेशन लोटसबाबत भाजप गंभीर असण्यामागचं नेमकं कारण काय, हे देखील समोर आलंय. भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या अध्यक्षते खाली एख तीन सदस्यांची समिती भाजपने कामाला लावली होती. या समितीने लोकसभा जागांबाबतचा एक महत्त्वपूर्ण अहवाल तयार केला होता. या अहवालाने भाजपला घामच फोडलाय. हा अहवाल चिंतजानक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच भाजपकडून ऑपरेशन लोटसची तयारी करण्यात आली आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्रात शहांच्या प्लानवर काम सुरु भाजपनं गियर बदलला; दोन्ही DCMचे होमग्राऊंड ताब्यात घेण्यासाठी टीम देवेंद्रचे शिलेदार सक्रिय

विनोद तावडे यांनी दिलेल्या अहवालात नेमकं काय यावरुनही तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढले होते. तेव्हा युतीला ४२ जागा जिंकता आल्या होत्या. पण २०२४ च्या निवडणुकीत या जागा घटण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. २०२४ मध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या २२ ते २५ पेक्षा कमी जागा निवडून येतील, असा अंदाज तावडेंच्या अहवालातून वर्तवण्यात आल्याचं कळत आहे.

तावडे समिनीने दिलेला हा अहवाल भाजपच्या हायकमांडने सीरिअसली घेतला. त्यामुळेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. अजित पवारांची सुरु झालेली ही चर्चा विधानसभेसाठी नाही, तर २०२४ साठी मोदींनी महाराष्ट्रातील वातावरण सेफ करण्यासाठी केलं जात असल्याचाही एक तर्क लढवला जात आहे. तुर्तास अजित पवारांनी आपण राष्ट्रवादीचेच असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण यामुळे एक वेगळीच शंका उपस्थित केली जात आहे. अजित पवारांनी भाजपसोबत जाणं टाळलं, की पोस्टपोन्ड केलं? या चर्चांना आता उधाण आलं आहे. महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

अधिक वाचा  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महेश मांजरेकरांना जीवनगौरव विशेष पुरस्कार जाहीर