जगातील मोबाईल कंपन्यांमधील सर्वात मोठी कंपनी ‘ॲपल’ने भारतातील पहिल्यावाहिल्या ‘ॲपल’ स्टोअरचे उदघाटन केले आहे. यासाठी स्वतः ‘ॲपल’चे सीईओ टीम कुक हे भारतात दाखल झाले असून त्यांच्या हस्ते हे उदघाटन करण्यात आले. १७ मार्चला ते भारतामध्ये दाखल झाले असून त्यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली होती.

‘ॲपल’चे सीईओ टीम कुक यांनी ट्विट केले की, “मुंबईतील ऊर्जा, सर्जनशीलता आणि उत्कंठावर्धक वातावरण अविश्वसनीय आहे. आम्ही मुंबईतील बीकेसीमध्ये ‘ॲपल’चे पहिल्या स्टोअरचे उदघाटन करण्यास उत्सुक आहोत.” असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, काल सीईओ कूक यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी व टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. तसेच, त्यांनी बॉलिवूडची अभिनेत्री माधुरी दीक्षितची देखील त्यांनी भेट घेतली. तिच्यासोबत त्यांनी मुंबईच्या वडापावचा आस्वाद घेतला.

अधिक वाचा  अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस पुण्यात सोसायटीत राडा; महिलांना केस ओढत मारहाण व्हिडिओ आता समोर

२५ वर्षांनंतर उघडले पहिले ॲपल स्टोअर

ॲपल स्टोअर अशा वेळी उघडले आहे जय वर्षी कंपनी भारतामध्ये आपले २५ सावे वर्ष साजरे करत आहे. बीकेसीमध्ये स्टोअर सुरु झाल्यावर २० तारखेला दिल्लीमध्ये ॲपल चे दुसरे स्टोअर सुरु होणार आहे. ॲपल कडे भारतासाठी मोठ्या योजना आहेत, ज्यात एक मजबूत अॅप डेव्हलपर इकोसिस्टम, टिकाऊपणाचे समर्पण, अनेक ठिकाणी समुदाय कार्यक्रम आणि स्थानिक उत्पादन यांचा समावेश आहे.