द न्यू इंडियन एक्सप्रेसचे मंत्रालयातील प्रतिनिधी सुधीर सुर्यवंशी यांनी सर्वप्रथम अजित पवार यांच्या बंडाबाबतची बातमी दिली. मंत्रालयातील अत्यंत बारीक-सारीक घटना-घडामोडींचा मागोवा घेणाऱ्या सुर्यवंशी यांनीच अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, असं भाजपला का वाटतंय, यावर भाष्य केलंय.
त्यातील महत्त्वाची कारण पुढील प्रमाणे-राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडे नेते असून आतापर्यंत त्यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. त्यामुळे त्यांच्या गाठीशी मोठा अनुभव आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून जे क्लिक होत नाही, किंवा ग्राउंड लेव्हलवर जो प्रतिसाद पाहिजे, एकनाथ शिंदे यांच्याकडून जे मिळत नाहीये, हे भाजपाच्या अंतर्गत सर्वेवरून दिसून आलंय. खासगी कंपन्यांच्या सर्वेतूनही हे दिसून आलंय.. अजित पवार हे मराठा स्ट्राँग चेहरा आहेत.. एकनाथ शिंदे मराठा असले तरीही त्यांनी तशी इमेज कधी तयार केली नाही. पण अजित पवारांची तशी इमेज आहे. मराठा समाजातून त्यांना मोठा पाठिंबा आहे. एक ३५ टक्के व्होटबँक मराठ्यांची आहे. ती काबीज करण्यासाठी भाजपाला अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, असं वाटणं सहाजिक आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधीच?
दरम्यान, अजित पवारांच्या नेृतृत्वात पुन्हा एकदा सरकार बदलाच्या हालचाली सुरु आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालात एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडू शकतं. त्यामुळे निकालाआधीच अजित पवारांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करणं भाजपाला फायद्याचं ठरू शकतं, असा तर्कही दिला जातोय. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधीच राज्यात सर्वात मोठी घडामोड घडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.