राज्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. नवी मुंबईनंतर सर्वात मोठी असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुमारे १९ वर्षानंतर होत आहे. या निवडणुकीत एकुण १८ संचालकांची निवड होणार आहे. यातील ११ जागा सोसायटी गटातून, चार जागा ग्रामपंचायत गटातून, दोन जागा व्यापारी गटातून तर एक जागा हमाल, तोलणार गटातून निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीसाठी साडे सतरा हजार मतदार आहेत. चारशे मतदारांसाठी एक मतदान केंद्र अशी रचना करण्यात येणार आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलकडून १५ पैकी उर्वरित ५ जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाला पॅनेलमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही.

अधिक वाचा  मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

एकूण संचालक मंडळाच्या १८ जागांपैकी व्यापारी-अडते आणि हमाल-तोलणार गटाच्या ३ जागा वगळून विकास सोसायटी आणि ग्रामपंचायत मतदार संघातील १५ जागांवरील उमेदवार जाहीर केले असून शुक्रवारी १० उमेदवार जाहीर केले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून उर्वरित ५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

विकास सोसायटी सर्वसाधारण गटातून दत्तात्रेय दिनकर चोरघे (रहाटवडे), कुलदीप गुलाबराव चरवड (वडगाव बुद्रूक), संदीप माणिकराव गोते (बिवरी-गोतेमळा), महिला प्रवर्गातून प्रतिभा महादेव कांचन (उरुळी कांचन), अनुसूचित जमाती गटातून नानासाहेब कोंडिबा आबनावे (बकोरी) यांचा समावेश आहे. रविवारी (दि.१६) सकाळी सर्वसाधारण गटातील 3 आणि महिला प्रवर्गाची 1 जागा व ग्रामपंचायत गटातील 1 जागेवरील मिळून 5 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

अधिक वाचा  केएल राहुलच्या ‘त्या’ कृत्यामुळे आईने बोलणंच केलं होतं बंद; नेमकं काय घडलं?

भाजपला सोडचिठ्ठी, राष्ट्रवादीकडून उमेदवारी…

उरुळीकांचन येथील महादेव कांचन यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शनिवारी (दि.१५)प्रवेश केला आणि रविवारी लगेचच त्यांच्या पत्नी प्रतिभा कांचन यांना महिला प्रवर्गातून राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली आहे.