नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली खासदारकी गमावल्यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर सडकुन टीका केली आहे.रविवारी कर्नाटकातील कोलारमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना त्यांनी ही टीका केली. यावेळी त्यांनी, “मी संसदेत विचारले की अदानींच्या शेल कंपनीचे 20 हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? त्यानंतर भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारने संसदेचे कामकाज होऊ दिले नाही.” असा आरोप यावेळी त्यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी रॅलीला संबोधित करताना,”आम्ही कर्नाटकच्या जनतेला चार आश्वासने दिली आहेत. पहिलं म्हणजे प्रत्येक घरातील कुटुंबाला 200 युनिट मोफत वीज दिली जाईल. असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. दुसरे वचन प्रत्येक महिलेला दरमहा 2000 रुपये दिले जातील. तिसरे आश्वासन म्हणजे दर महिन्याला प्रत्येक कुटुंबाला 10 किलो तांदूळ मोफत देण्यात येईल. चौथी योजना अशी आहे की कर्नाटकातील प्रत्येक पदवीधराला 3000 रुपये आणि डिप्लोमाधारकाला 2 वर्षांसाठी दरमहा 1500 रुपये दिले जातील. रॅलीत बोलताना राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावरून त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. राहुल म्हणाले की, ”पंतप्रधान, तुम्ही अदानीला हजारो कोटी रुपये देऊ शकत असाल तर आम्ही गरीब, महिला आणि तरुणांना पैसे देऊ शकतो.काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, मी संसदेत विचारले की अदानींच्या शेल कंपनीचे 20 हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? त्यानंतर भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारने संसदेचे कामकाज होऊ दिले नाही.असा आरोप यावेळी त्यांनी केला.

अधिक वाचा  ‘हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना….’ संजय निरुपम मराठी vs हिंदी वादात काय म्हणाले?

पुढे बोलताना, “सहसा विरोधक संसद थांबवतात पण पहिल्यांदाच सरकारच्या मंत्र्यांनी संसद थांबवली. मला संसदेतून काढून टाकून आणि घाबरवू असा भाजपचा विचार आहे. मी त्यांना घाबरत नाही. मी पुन्हा सांगतो, पंतप्रधान, अदानीच्या शेल कंपनीतील हे 20,000 कोटी रुपये कोणाचे आहेत? याचे उत्तर मिळेपर्यंत मी थांबणार नाही. मला अपात्र करा, तुरुंगात टाका, माझी हरकत नाही ते करा, असे ते म्हणाले. अदानीच्या डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत चीनचे संचालक बसले आहेत. त्यांच्या शेल कंपनीत चीनचा डायरेक्टर आहे. याबाबत कोणताही तपास सुरू नाही.असे देखील यावेळी त्यांनी म्हटले.

अधिक वाचा  ”वकिलीचा दुरुपयोग, गावकऱ्यांनी मारहाण केलीच नाही” बीड प्रकरणात गावच्या महिला सरसावल्या