पंजाब येथील बठिंडाच्या सैनिकी ठाण्यात 12 एप्रिल रोजी गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेत चारजवानांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एका जवानाला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.याबाबत पंजाब पोलीस पत्रकार परिष देऊन या प्रकरणाचा खुलासा करणार आहे.12 एप्रिल रोजी पहाटे 4.35 मिनिटांच्या आसपास ही गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच शीघ्र कृती दल घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली. हल्लेखोर हा साध्या वेषात होता. ज्यांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे ते 80 मीडियम रेंजचे जवान होते. गोळीबाराची ही घटना ऑफिसर्स मेसमध्ये घडली होती. या घटनेपूर्वी सैनिकी ठाण्यातून 28 राऊंट काडतुसं गायब झाली होती. त्यामुळे त्याच काडतुसांचा वापर या घटनेत झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अधिक वाचा  राज ठाकरे-उद्धव ठाकरे येऊ शकतात एकत्र, ‘ही’ आहेत पाच कारणं! जाणून घ्या सविस्तर

पंजाब पोलिसांनी हा हल्ला दहशतवादी हल्ला नसल्याचं म्हटलं होतं. हा गोळीबार अंतर्गत वादातून झाला असावा
असा अंदाज यापूर्वीच वर्तवण्यात आला होता. या प्रकरणी रविवारी चार जवानांची चौकशी करण्यात आली होती.
त्यानंतर एका जवानाला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.