नागपूर :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी नागपूरमधील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. राज्यात अवकाळी पाऊस पडतोय, गारपीट होतेय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. अवकाळी पाऊस पडला आणि शेतकऱ्यांच्या सोन्या सारख्या पिकाचं नुकसान झालं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पंचनामा करायला देखील सरकारी अधिकारी वेळेवर जात नाहीत, अशी टीका सभेत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार केली. यावेळी विरोधीपक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर जोरदार टीका केली. आम्ही सरकारमध्ये असताना न्यायालयाने राममंदिरांचा निकाल दिला. आता हे अयोध्येला गेले. पण सुरुवातीला हे सुरतला गेला. हिंदुत्व असतं तर आधी अयोध्येला गेले असते.

अधिक वाचा  मंत्रिमंडळ बैठकीत 3 धडाकेबाज निर्णय, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार; कॅबिनेटमध्ये 7 मोठे निर्णय

महाविकास आघाडी सरकार होतं, त्यावेळी शेतकऱ्यांच्या हातात कमीत कमी वेळेत मदत पोहोचवली होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले. काम करायचं असेल तर कुठूनही करु शकतो. नुसतंच वण वण फिरल्यावर काम होतं, असं नसतं. महागाई वाढत चालली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात, नागपूरमध्ये येणारी एअरबस गुजरातमध्ये गेली, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार स्थापन करुन एकनाथ शिंदे यांनी ८ महिन्यांपेक्षा अधिक वेळ झाला आहे. ८ वर्षांपेक्षा अधिक सरकार मोदींचं केंद्रात आहे. पण, तुम्ही जनतेला मुलासारखं सांभाळू शकले नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजप नेते चंद्रकांत पाटील जे बोलले ते तुम्हाला पटतंय का? शिवसेनाप्रमुखांचं योगदान नाकारता असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मर्द असाल तर मैदानात या, मैदान मिळू नये म्हणून काड्या कशाला घालता, असं उद्धव ठाकरे म्हणाले. जनता जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अधिक वाचा  अखेर भाजप- काँग्रेसची युती झालीच; पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याने इतिहासच रचला

ठाण्यात रोशनी शिंदे हिला मारहाण करण्यात आली. ती सांगत होती मातृत्त्वाचे उपचार घेत होती. तिला मारहाण करण्यात आली होती. पोलीस तिची तक्रार घेण्याऐवजी तिच्यावरच गुन्हे दाखल करत होते. मग तिला आम्ही मुंबईतील रुग्णालयात आणलं. त्यामुळं मी फडतूस हा शब्द गृहमंत्र्यांसाठी वापरला,असं उद्धव ठाकरे म्हणाले. संघाला, नरेंद्र मोदींना आणि अमित शाहांना असा कारभार मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. अन्याय करणारे आणि गुलाम करणारे त्या खूर्चीवर बसून द्यायचं नाही, ही शपथ घ्यायची आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मतदानातून तुम्ही या सर्वांना उत्तर देऊ शकता, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अधिक वाचा  तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : ससूनची दीनानाथ रुग्णालयासह डॉ. घैसास यांना ‘क्लीन चिट’

यासाठीच तुम्ही अयोध्येत गेले; फडणवीसांना टोला

 हे अयोध्येला गेले त्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीसही गेले. फडणवीस आजपर्यंत कधी अयोध्येला गेले, हे तुम्हाला कधी आठवतं का, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच केवळ तुझा शर्ट माझ्यापेक्षा भगवा कसा, यासाठीच हेही अयोध्येला गेल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचं नाव न घेता लगावला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगाव की, भाजप आणि तुमचं काय सुरू आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याच नाही. पण यांचं हिंदुत्व हे गोमुत्रधारी आहे. आमचं हिंदुत्व राष्ट्रीयत्व असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.