नवी दिल्ली – सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही समन्स बजावले आहे. त्यावर राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोदींना या देशातील विरोधी पक्षच संपवायचे आहेत.त्यासाठीच मोदी त्यांच्या विरोधात उभे राहणाऱ्या नेत्यांना अशा पद्धतीने अपमानित करीत आहेत, त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे.

सिब्बल यांनी सर्व विरोधी पक्षांना केंद्रीय यंत्रणांचा सध्या जो दुरुपयोग सुरू आहे त्याच्या विरोधात एका आवाजात बोलण्याचे आवाहन केले. सर्वच विरोधकांनी एकत्र आल्याशिवाय
भाजपचा समर्थपणे मुकाबला करता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपने विरोधी पक्षांचे नेते आणि मुख्यमंत्र्यांना सातत्याने लक्ष्य केले आहे. विरोधी पक्ष नेत्यांची प्रतिमा खराब करण्याचा कुटील हेतूही ते बाळगून आहेत, असे सिब्बल यांनी म्हटले आहे.सीबीआयने शुक्रवारी केजरीवाल यांना कथित उत्पादन शुल्क धोरण घोटळाप्रकरणी 16 एप्रिल रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. आम आदमी पक्षाचे दुसरे नेते मनीष सिसोदिया यांना या आधीच या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

अधिक वाचा  दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गरोदर महिला मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच मोठ पाऊल; उद्या पुढची दिशा निश्चित