पुणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे.सोबत गारांचा मारा देखील सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुण्यात देखील तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. दरम्यान पुणे शहरासह उपनगरांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवस पुण्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.त्यानुसार आज पुण्यातील कोथरूड परिसरात पावसाला सुरूवात झाली आहे.

अधिक वाचा  सरकारी बाबूंचे लाड बंद! आता पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास मोठी कारवाई, महसूलमंत्र्यांच्या त्या आदेशाने प्रशासनात खळबळ

गारा आणि वारे देखील वाहत आहे. त्यामुळे नागरीकांनी काळजी घेण्याचे आवागन प्रशासनानेकेले आहे. तसेच मध्य पुण्यात देखील पावसाला सुरूवात झाली आहे. खडकी, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, धनकवडी परिसरात दखील जोरदार पाऊस सुरु झाला आहे.एकीकडे उकाडा जाणवत आहे तर पाऊस देखील पडत आहे. पुण्यात पुढील २ दिवस येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आज आणि उद्या शहरात जोरदार पावसाचा होण्याची शक्यता आहे. यासोबच उष्णतेचा पारा देखील वाढणार आहे. तापमान ४० अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.आज (ता. १५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अधिक वाचा  जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, 27 जणांचा मृत्यू!