अजय देवगणच्या याआधी रिलीज झालेल्या ‘दृश्यम २’ या सिनेमाने वर्ल्डवाईल्ड १०० कोटींचा आकडा पार केला आहे.हा टप्पा पार करण्यासाठी चित्रपटाला 17 दिवस लागले. भोला तिसर्‍या आठवड्यात आहे आणि सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान (२१ एप्रिल रोजी रिलीज) होण्याआधी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला अद्याप कोणतीही स्पर्धा दिसलेली नाही. तिसऱ्या आठवड्यात हा चित्रपट 80 कोटींहून अधिक गल्ला जमावू शकतो.

16व्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले, तर तिसर्‍या शुक्रवारी अजय देवगणच्या भोला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1.80 कोटींचा बिझनेस केला आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई आता 80.29 कोटींवर गेली आहे. तर भोलाचे वर्ल्ड वाइल्ड कलेक्शन 101.50 कोटी रुपये झाले आहे.

अधिक वाचा  कुणाल कामराला मोठा दिलासा; बजावलेल्या नोटीसीतील मोठी चूक पथ्यावर शिंदे प्रकरणी अटकेपासून संरक्षण हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

‘भोला’ बद्दल बोलायचे तर अजय देवगणच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चौथा चित्रपट आहे. अभिनेत्याने 2008 मध्ये आलेल्या ‘यू मी और हम’ या रोमँटिक ड्रामाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात अजयने त्याची अभिनेत्री पत्नी काजोलसोबत काम केले होते. यानंतर आठ वर्षानंतर 2016 मध्ये रिलीज ‘शिवाय’चं दिग्दर्शन केलं. 2022 मध्ये त्याने ‘रनवे 34’ दिग्दर्शन केलं आणि त्यानंतर ‘भोला’चं.

‘भोला’ हा २०१९ मध्ये आलेल्या ‘कैथी’ या तमिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू या सिनेमात लीड रोलमध्ये आहे. याशिवाय मकरंद देशपांडे, दीपक डोबरियाल आणि गजराज राव हेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

अधिक वाचा  पहलगाममध्ये दहशतवादी उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या कलमा पढायला सांगितलं पँट काढली अन्…!